Daily Mahasatta

Daily Mahasatta

भारती हॉस्पिटलला फोर्स मोटर्सतर्फे रुग्णवाहिका प्रदान

सांगली: (प्रतिनिधी)

श्री फिरोदिया ट्रस्ट यांच्यामार्फत येथील भारती हॉस्पिटलला फोर्स मोटर्सनी रुग्णवाहिका प्रदान केली. त्याची प्रतिकात्मक चावी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांच्याकडे एरिया सेल्स मॅनेजर मंदार माळी यांनी दिली. यावेळी भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ. एच.एम. कदम, डीन डॉ. शहाजी देशमुख, वैदयकीय अधीक्षक डॉ. सारा धनवडे उपस्थित होते.
सर्व सोयीनीयुक्त असणारी ही रुग्णवाहिका गंभीर असणाऱ्या रूग्णांना उपयुक्त ठरणार असल्याचे मंत्री डॉ. कदम यांनी सांगितले. यामध्ये व्हेंटिलेटर, इमर्जन्सी कीट, ट्रॉली, ऑक्सिजन, यासह इमर्जन्सी मेडिसीन, सक्शन मशीन, मॉनिटर सिरीज पंप या सुविधेसह ही रुग्णवाहिका वातानुकुलित आहे.
कोरोनाला अटकाव करण्यासाठी भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्यावतीने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

सांगली आणि पलूस कडेगाव मतदारसंघातील तसेच परिसरातील ग्रामीण भागातील रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी भारती विद्यापीठ नेहमीच प्रयत्नशील असते. या कार्याला एक सलाम म्हणून फोर्स मोटर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रसन्न फिरोदिया यांनी एक अद्ययावत कार्डियाक ॲम्बुलन्स प्रदान केली. मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी भारती विद्यापीठाच्यावतीने फोर्स मोटर्स कंपनीचे आभार मानले. डेंटलच्या प्राचार्या डॉ. विद्या दोडवाड, डॉ. आर.बी.कुलकर्णी, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील पाटील, जी.बी.धुमाळे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments