Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक

सांगली (प्रतिनिधी)
सांगली जिल्ह्यात आज ८६२ रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर आज दिवसभरात कोरोनामुळे २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यभरात कोरोनाचे प्रमाण आटोक्यात आले असले तरी सांगली जिल्ह्यात मात्र कोरोनाचा उद्रेक सुरू असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने सांगली जिल्ह्यासह राज्यातील अन्य ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यातील रुग्ण संख्या दररोज 900 ते 1000 च्या आसपास स्थिरावल्याचे दिसून येत आहे. मात्र रुग्ण संख्या अजूनही  आटोक्यात आली नसल्याचे समोर येत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ७ हजार ११८ रुग्ण उपचाराखाली आहेत.
 

Post a Comment

0 Comments