Daily Mahasatta

Daily Mahasatta

सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी यांची बदली


कडेगाव ( सचिन मोहिते)
चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात मागील दोन ते अडिच वर्षापूर्वी सहाय्यक पोलिस निरिक्षक पदी एका अधिकाऱ्यांची निवड झाली . सर्वसामान्य जनतेत पोलिस अधिकारी म्हटले कि भिती व भय हे असतेच तसेच काहिसे वातावरण येथील जनतेमध्ये होते . परंतु काही दिवसात पोलिसाविषयी असणाऱ्या भावना व विचार  यात वेगळेपण दिसायला लागले होते. कारण भागातील जनतेमध्ये पोलिसांविषय आदर प्रेम आपूलकी निर्माण झाली होती. येथे नियुक्त झालेले सहाय्यक  पोलिस निरीक्षक संतोष गोसावी  यांची कार्य करण्याची पद्धतच वेगळी होती .सर्व  लोकांसोबत मित्रत्वाने वागणे , सर्वाना समान वागणूक देणे ,जणू काही वर्षानुवर्षे एकमेकांना ओळखत आहोत, आपले काहीतरी अदृश्य नाते आहे अशी आपुलकीची, आपलेपणाची, हक्काची भावना निर्माण झाली प्रत्येकाला समजावून घेणे व समजावून सांगणे असे बरेच गुण त्यांच्या अंगी होते त्यामुळे त्यांच्या स्टाफ मधिल कर्मचारी यांचेमध्ये सुद्धा कार्य करण्याच्या पध्दतीत बराच बदल झालेला होता . यामुळेच चिंचणी वांगी  पोलीस स्टेशन चे नाव सांगली जिल्यात आदराने घेतले जाऊ लागले. यांचे कालावधीत अंबक फाटा मर्डर केस, वडीयेरायबाग येथील ३ वर्षाच्या लहान मुलाचा मर्डर, देवराष्ट्रे मर्डर, पाडळी हाफ मर्डर, तडसार मर्डर, जनावरे चोरी, मोटर चोरी, ऊसतोड मुकादम यांना वेषांतर करून पकडणे, तीन ते चार वर्षांपूर्वीपासून गायब असलेल्या अल्पवयीन मुलींना शोधणे, फरार आरोपी पकडणे,पर राज्यातून  मिसिंग महिला शोधून आणणे, सोनहिरा कारखाना ऊसतोड कामगार प्रश्न, लिंगायत समाज दफन भूमी वांगी, वाणी समाज दफन भूमी प्रश्न देवराष्ट्रे, तसेच कोरोणा काळात  केलेले दिवस रात्र काम, सर्व सण उत्सव, पूर स्थिती, बरेच दिवाणी, घरगुती वाद सामंजस्यने मिटवण्यासाठी खूप परिश्रम घेतले होते .त्यामुळे पोलिसांचे बद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनात  चांगली भावना निर्माण झाली होती .
अशा  मा .संतोष गोसावी या आदर्श पोलिस अधिकाऱ्यांची बदली झालेनंतर बऱ्याचजणांना  वाईट वाटत होते कारण सर्वसामान्य जनतेतून सोशल मिडियातून साहेबांच्या बदलीनंतर प्रत्येका येणाऱ्या भावना व्या कुठेतरी हृदयाला पाझर फोडुन जात होत्या .
       अशा या कर्तव्य दक्ष सहाय्यक पोलिस निरीक्षक
संतोष गोसावी यांची कडेगाव पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.

Post a Comment

0 Comments