Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोल्हापूर परिमंडळाच्या मुख्य अभियंता पदी परेश भागवत रुजू


 कोल्हापूर  : महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळाच्या मुख्य अभियंता पदी श्री.परेश भागवत हे आज दि.17 ऑगस्ट रोजी रूजू झाले आहेत. यापुर्वी ते  मुख्य अभियंता या पदावर प्रकाशगड मुख्यालयात कार्यरत होते. त्यांना विद्युत क्षेत्रात 24 वर्षे सेवेचा प्रदीर्घ अनुभव आहे.

श्री. परेश भागवत हे कोल्हापूर जिल्ह्यातील पाचगाव या गावचे  मुळ रहिवासी आहेत. त्यांनी  वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली येथून विद्युत आभियांत्रिकी शाखेत पदवी प्राप्त केली आहे. वित्त व्यवस्थापन शाखेतील पदव्युत्तर पदवीचे  शिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे.

ते 1997 साली तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून सेवेत दाखल झाले. रत्नागिरी परिमंडळातील कुडाळ विभागामध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर ते रुजू झाले. त्यांनी 1999 ते 2006 या कालावधीत कोल्हापूर शहर व ग्रामीण विभागात सेवा बजाविली आहे. ऑगस्ट 2006 मध्ये सरळ सेवेने त्यांची निवड कार्यकारी अभियंता या पदावर झाली. रत्नागिरी परिमंडळात नवनिर्मित खेड विभागाचा कार्यभार त्यांनी सांभाळला. 2007 ते 2011 पर्यंत ते भिवंडी येथील टोरंटो पॉवर डिस्ट्रीब्युशन फ्रँचाईजीत सहाय्यक महाव्यवस्थापक या पदावर ते प्रतिनियुक्तीवर होते. त्यांनी माहे जानेवारी 2012 ते जुलै 2021 या कालावधीत कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता या पदावर महावितरणच्या प्रकाशगड येथील मुख्य कार्यालयात विविध विभागाची जबाबदारी पार पाडली आहे.

 

Post a Comment

0 Comments