Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीच्या कॉंग्रेस भवन मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

सांगली, (प्रतिनिधी)
सांगली शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते कॉंग्रेस भवन येथे झेंडावंदन करण्यात आले.

स्टेशन चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा श्रीमती शैलजाभाभी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी अजित ढोले, शारदाताई मोरे, पैगंबर शेख, मौला वंटमुरे, अरुण पळसुले, तुकाराम बगाडे, राजश्री मालवणकर, मधुकर कोष्टी, बाबगोंडा पाटील, संतोष भोसले, राजेंद्र कांबळे, रामचंद्र पवार, श्रीधर बारटक्के, विठ्ठल रोकडे, सुवर्णा पाटील, नामदेव पठाडे, सुभाष पट्टणशेट्टी, हनमंतराव वडर, बेबीनंदा चिगटेरी, बेबी शेख, जन्नतबी नायकवडी, रजिया अन्सारी, शमशाद नायकवडी, शिवाजी सावंत, गणेश वाघमारे, शिवाजी पाटील, प्रकाश माने आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

-----------

Post a Comment

0 Comments