Daily Mahasatta

Daily Mahasatta

राज्यातील दुकाने ८ वाजेपर्यंतसुरू राहणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सांगली (प्रतिनिधी )
राज्यातील ज्या जिल्ह्यातील रुग्ण संख्या कमी झाली आहे, त्या ठिकाणी दुकाने आठ वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र ज्या जिल्ह्यात रुग्ण संख्येत वाढ होत आहे त्याठिकाणी निर्बंध जैसे थे राहतील, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगलीत पत्रकार परिषदेत दिली.
      
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील दुकाने आठ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी मिळावी अशी मागणी होत होती. याबाबत आज आदेश देण्यात येतील. परंतु ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढ होत आहे. त्याठिकाणी मात्र निर्बंध जैसे थे राहणार आहेत. आगामी काही महिन्यात कोरोना ची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून याबाबत निर्बंध कठोर  करण्याबाबत केंद्र सरकारने देखिल सूचना केल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. खासगी कार्यालयांनी देखील आपल्या वेळेत बदल करून गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच गरज वाटल्यास 24 तास कार्यालय सुरू ठेवा मात्र गर्दी टाळा अशा सूचना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केल्या.

Post a Comment

1 Comments