Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यात स्वातंत्र्य दिनी' निसर्ग फाऊंडेशन' ची स्थापना


विटा (प्रतिनिधी)
विटा येथील श्रेयस भवनमध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत निसर्ग फाऊंडेशन" ची स्थापना व संस्थेचा उद्दघाटन सोहळा संपन्न झाला.
यावेळी संस्थेचा लोगोचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 याप्रसंगी आदर्श सरपंच सुशांत देवकर म्हणाले की सामाजिक क्षेत्रात सातत्याने अग्रभागी असलेल्या सर्व निसर्गमित्रांनी आज निसर्ग फाऊंडेशन ची निर्मिती करत आपली सामाजिक वाटचाल गतीमान केली आहे. संस्थेचे विविध उपक्रम हे समाजहितार्थ असल्याने भविष्यात युवावर्गाला स्वयंरोजगार निर्माण करणरे आहेत असे प्रतिपादन केले.
यावेळी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य तथा आरपीआय चे लोकसभा अध्यक्ष संदेश भंडारे म्हणाले की, निसर्ग फाऊंडेशन हे जिल्यातील सर्वोतम संस्था ठरेल. संस्थेने रोजगार निर्मितीमध्ये पुढाकार घेतला आहे. संस्थेच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत. संस्थेला राज्यपातळीवर पोहचवण्यासाठी सर्वोतोपरि मदत करु असे यावेळी मनोगत व्यक्त केले.
  
यावेळी नियोजन समितीचे सदस्य व मा. जि.प. सदस्य सुहास शिंदे, आदर्श जि.प. सदस्य फिरोज शेख, शिकलगार संघटनेचे युवाजिल्हाध्यक्ष याकुब शिकलगार यांनी मनोगतातून शुभेच्छा दिल्या.
 
अध्यक्षयीन मनोगतात ॲड बाबासाहेब मुळीक म्हणाले की, निसर्ग फाऊंडेशन हे तरुणांचे संघटन आहे. सातत्याने सक्रिय असलेल्या युवा पिढीला निसर्ग फाऊंडेशन हे समाजिक क्षेत्रातील अव्वल व्यासपीठ आहे. निसर्ग फाऊंडेशनची ध्येयधोरणे हे स्वयंरोजगाराला चालना देणारे आहेत. जिल्हा प्रशासनाद्वारे संस्थेला विविध शासकीय उपक्रम व भविष्यातील वाटचालीस मदत मिळवून देऊ असे प्रतिपादन केले.
निसर्ग फाऊंडेशनवतीने पहिला उपक्रम घेत निर्मलग्राम सांगोले येथे वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी उद्दघाटक राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ॲड बाबासाहेब मुळीक, आरपीआय लोकसभा अध्यक्ष तथा जिल्हा दक्षता नियंत्रण समितीचे सदस्य संदेश भंडारे,   जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व मा. जि. प. सदस्य सुहास शिंदे, आदर्श जि.प. सदस्य फिरोज शेख, खानापूर तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे अध्यक्ष किसनराव जानकर, आदर्श सरपंच सुशांत देवकर, आरपीआय खानापूर तालुकाध्यक्ष दादासाहेब चंदनशिवे, सांगली जिल्हा युवक शिकलगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष याकुब शिकलगार, आयपीआय युवक खानापूर तालुकाध्यक्ष स्नेहलकुमार कांबळे, पोपट चंदनशिवे, सुधीर कांबळे, डॉ. शिवाजी गुजर, महावितरण विभागातील शंकर भोसले, श्रवण कांबळे आदी मान्यवरांनी उद्दघाटन सोहळ्यास उपस्थिती दर्शवली.
  
यावेळी निसर्ग फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन चंदनशिवे, सचिव नानासाहेब मंडलिक, उपाध्यक्ष गणेश धेंडे, खजिनदार भगवान जाधव, संचालक डॉ. वैशाली हजारे, प्रमोद भोसले, सुरज मंडले, कोमल हसबे, पुजा शेलारे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक नितीन चंदनशिवे यांनी केले तर आभार व सुत्रसंचालन गणेश धेंडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments