Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिक्षक बँकेमुळे प्राथमिक शिक्षकांची पत वाढली : शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे


सांगली (प्रतिनिधी)
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेमुळे अनेक सभासदांना आर्थिक उन्नती करण्यासाठी मोठा दिलासा मिळाल्याने प्राथमिक शिक्षकांची पत वाढली असल्याचे प्रतिपादन सांगलीचे शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे साहेब यांनी केले. त्यांनी शिक्षक बँकेस सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते.

अनेक शिक्षकांना आपली वैयक्तिक , कौटुंबिक प्रगती करण्यासाठी शिक्षकांची बँक ही कामधेनू म्हणून सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. शिवाय सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनाही आपण सभासद करून आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग दाखवला असल्याने सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक सुद्धा समाधानी आहेत. असे गौरवोद्गार कांबळे साहेबांनी काढले.
यावेळी कांबळे साहेब व उपशिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांचे स्वागत व्हाईस चेअरमन राजाराम सावंत यांनी केले. प्रास्ताविक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड यांनी केले .शिक्षक बँकेच्या विविध योजनांचा आढावा चेअरमन यु . टी .जाधव यांनी मांडला . राज्य संघटक सयाजीराव पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी साहेब शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे साहेब उपशिक्षणाधिकारी महेश धोत्रे साहेब तसेच जि प . चे अध्यक्ष प्राजक्ता ताई कोरे, उपाध्यक्ष  पप्पू डोंगरे साहेब ,शिक्षण सभापती आशाताई पाटील यांनी गत आठ वर्षानंतर प्रथमच१०० % वरिष्ठ मुख्याध्यापक पदे भरल्याने पदाधिकारी व प्रशासनाचे  अभिनंदन केले. शिवाय उर्वरित प्रश्न लवकरच सुटण्याची आशा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना यामुळे निर्माण झाली आहे.

सभासदांसाठी विविध योजना राबवण्यात पुरोगामी सेवा मंडळ यशस्वी झाल्याचे  पार्लमेंटरी बोर्ड सचिव शशिकांत भागवत यांनी सांगितले. यावेळी पार्लमेंटरी बोर्ड अध्यक्ष किसनराव पाटील, माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक शशिकांत बजबळे , तुकाराम गायकवाड, श्रेणिक चौगुले ,.लहू वाघमोडे, एम बी चव्हाण, उत्तम चाबरे तसेच शिक्षक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.बी कोले , मॅनेजर इंटंगी साहेब, असिस्टंट मॅनेजर प्रमोद पाटील व नवले साहेब आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments