Daily Mahasatta

Daily Mahasatta

विरोधकांच्या रक्तातच भ्रष्टाचार : खंडेराव जाधव यांची टीकासां


इस्लामपूर  (हैबत पाटील)
अपवादाने जे नगरसेवक व सत्तेत आलेत आणि इस्लामपूरच्या जनतेने  ज्यांना  सरळ सरळ नाकारले आहे त्यांनी आपल्या मर्यादा सोडून बोलू नये . जनतेची सरळ मार्गाने कामे करावी. असा  असा थेट निशाणा वैभव पवार  व नगराध्यक्ष यांच्यावर नगरसेवक खंडेराव जाधव यांनीआज साधला.

येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन मध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
वैभव पवार यांच्याकडून होत असलेल्या आरोपाला त्यांनी आज  पत्रकार परिषदेत उत्तर दिले.निनाई नगर मध्ये असलेली जयंत पाटील व विजय भाऊ पाटील  व्यायाम शाळा ताब्यात घेण्याचा करार हा बेकायदेशीर असल्याचा ठराव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी  केला होता. त्यावर खंडेराव जाधव म्हणाले,  जयंत पाटील यांनी त्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये देऊन शहरात अनेक इमारती जनतेसाठी उभ्या केल्या  आहेत .त्या इमारती देखभाल दुरुस्ती विना धूळखात पडून आहेत हे कितपत योग्य आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 सत्ताधाऱ्यांनी नगरपालिकेत  व्यायाम शाळा ताब्यात घेण्याचा करार हा बेकायदेशीर असल्याचा ठराव मंजूर केला होता त्यावर आम्ही जिल्हाधिकार्यांच्याकडे दाद मागितली होती. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी नागरपालिकेनेच घेतलेला ठराव हा बेकायदेशीर असल्याचा शेरा मारला असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले  ते  पुढे म्हणाले येथील निनाईनगर व विजयभाऊ व्यायामशाळा हस्तांतरन बेकायदेशीर असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी करत जिल्हाधिऱ्यांच्याकडे झालेल्या अपील सुनावणीत राष्ट्रवादीचे अपील फेटाळले असल्याचे वैभव पवार यांनी सांगितले होते, मात्र हे लोकांचे दिशाभूल करणारे आहे, कोणताही ठराव बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार नगराध्यक्ष यांना  नसतो अपील फेटाळले परंतु बेकायदेशीर ठरवलेले नाही . ठराव झाल्यानंतर तीन दिवसात अपील करण्याचा नियम आहे. सभागृहात नगराध्यक्षांनी स्वतःच ठराव झाल्याचे जाहीर केले. हेच मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्याना कळवले आहे. 

गेल्या पाच वर्षात कलम २७ खाली जे ठराव झालेत ते बेकायदेशीर आहेत यावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे खंडेराव जाधव यांनी सांगितले. भ्रष्टाचार हा त्यांच्या रक्तात भिनला आहे त्यांना जनतेने पूर्ण  नाकारले आहे . वैभव पवार यांचे नाव न घेता नगरसेवक खंडेराव जाधव म्हणाले, माझ्या विरोधात ते दोन वेळा पराभूत झाले आहेत 
१९८० साली भष्टाचाराच्या कारणावरून नगरपालिका बरखास्थ करावी लागली होती.१९६५ पासून त्यांनी बेकायदेशीर प्रॉपर्टी मध्ये पैसे मिळवलेत. आज अखेर ते बेकायदेशीर प्रॉपर्टीच वापरत आहेत. स्वतः बेकायदेशीर कामे करायची व दुसऱ्याला नावे ठेवायची हा त्यांचा उद्योग आहे. आमच्या आज पर्यंत च्या इतिहासात भष्टाचार  सत्ताधाऱ्यांनी दाखवावा ते म्हणतील ती शिक्षा आम्ही भोगू असे खंडेराव जाधव म्हणाले. जयंत पाटील यांनी आम्हाला परंपरा घालून दिली आहे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्यांनी आपली पात्रता तपासावी  सत्ताधाऱ्यांच्या बेकायदेशीर कारभारामुळे या ठिकाणी मुख्याधिकारी म्हणून अधिकारी यायला तयार नाहीत असे म्हणत सत्ताधार्यांनी सभागृहात हुकूमशाही , बेकायदेशीर कामे या व्यतिरिक्त काही केले नाही, त्यांनी जनतेसाठी केलेले एक काम सांगावे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 
या वेळी इस्लामपूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शहाजी पाटील,  नगरसेवक आनंदराव मलगुंडे, संग्राम पाटील, आयुब हवालदार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments