Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत शिवसेनेच्या पुढाकाराने आझाद चौक रिक्षा मित्र मंडळाचा शुभारंभ

सांगली (प्रतिनिधी)
आज स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने शिवसेनेच्या वतीने महात्मा गांधी मार्गावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम समोर आझाद चौक येथे गेली काही वर्षे बंद झालेला इंदिरा भवन रिक्षा स्टॉप शिवसेनेच्या पुढाकाराने आझाद चौक रिक्षा मित्र मंडळ या नावाने आणि शिवसेना शाखा स्थापन करून सुरू केला.

शिवसेना संघटक दिगंबर जाधव यांच्या हस्ते फित कापून आणि उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर शिवसेना शहरप्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे शहर प्रमुख हरिदास लेंगरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र राज्य प्रमुख डॉ किशोर ठाणेकर माजी शहरप्रमुख प्रसाद रीसवडे, कुपवाड शहर प्रमुख रुपेश मोकाशी संतोष पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि शिव बंधन बांधून सुरुवात करण्यात आली.

या रिक्षा स्टॉप च्या अध्यक्षपदी सुभाष जयस्वार यादव, उपाध्यक्ष आशुतोष कांबळे सेक्रेटरी प्रकाश जाधव खजिनदार पुंडलिक पोळ शाखेमधील दत्तात्रय डोरले इरफान शेरकर सुनील कांबळे मंजुनाथ गोसावी जहांगीर इनामदार संदीप पवार शैलेश यादव साई प्रसाद जाधव सुनील टिंगरे अमोल लोंढे आदी उपस्थित होते. या स्टॉप पासून प्रेरणा घेऊन आणखीही काही रिक्षाचालक मित्रांनी आपापल्या भागातील विविध कारणांनी बंद पडलेले रिक्षा स्टॉप पुनरुज्जीवित करण्याचा निर्धार व्यक्त केला हे या दिवसाचे आणखी एक फलित. रोजगार नाही नोकऱ्या नाहीत म्हणून हातावर हात धरून गप्प बसण्यापेक्षा स्वकष्टाने आपल्या संसाराचा गाडा हाताळणारे हे कष्टकरी मित्र पुन्हा उभे राहण्यात आपला हातभार लागतोय याचा अभिमान तर आहेच पण रिक्षा चालक हा सळसळीत रक्ताचा एक घटक, कोणतेही कारण नसताना शिवसेनेपासून दूर गेला होता तो पुन्हा एकदा शिवसेनेशी जोडला जातोय याचा अभिमान अधिक आहे, असे मनोगत शिवसेना पदाधिकार्यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments