Daily Mahasatta

Daily Mahasatta

बेत रविवारचा ग्रुपचा अनोखा उपक्रम, पेठ परिसरात होतंय कौतुक


पेठ (रियाज मुल्ला)
पेठ ता. वाळवा येथील बेत रविवारचा ट्रॅकर ग्रुपच्यावतीने पुराच्या काळात जीव धोक्यात घालून काम केलेल्या विद्युत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या अनोख्या सत्कार सोहळ्याचे पेठ परिसरात कौतुक होत आहे.
   गेल्या महिन्यात सलग पावसाने हजेरी लावल्याने पेठच्या तीळगंगा नदीच्या ओढापात्रास महापूर आला होता. पुराच्या पाण्यामुळे गावभागातील ट्रांसफार्मर बुडाल्याने तसेच विद्युत खांब जमीनदोस्त झाल्याने गावात विजेअभावी  काळोख पसरला होता. मात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून 72 तासाच्या आत गावातील खांब , विद्युत वाहिन्या, ट्रांसफार्मर दुरुस्त करून गावाला अंधारातून उजेडात  आणण्याचे काम महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केले. नेहमीच पडद्यामागचे सुत्रधार असलेले पेठ महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पूरपरिस्थितीत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पेठच्या बेत रविवारचा ट्रॅकर ग्रुप च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
     
गड -किल्ले संवर्धन करणे, गड-किल्ल्यांची निगा राखणे, गडावर साचलेला कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावणे अशी या ट्रॅकर ग्रुप ची संकल्पना आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव भांबुरे यांनी  स्वागत सागर भांबुरे यांनी तर आभार गणेश गोंधकर यांनी मानले.
   
याप्रसंगी हेंमत देसाई , पतंग पाटील , अभिराज पाटील ,रोहीत पाटील , रमेश माळी , महेश पाटील ,दिगु कुलकर्णी ,दिलीप पाटील  ,प्रविण पाटील  , संदीप पाटील, सनी पाटील ,जयदीप  पाटील, रोहन पाटील, गणेश जोशी ,संतोष गोंधळी , श्रीराम कुलकर्णी, हंसराज पाटील, गौरव पाटील, सोमनाथ जाधव ,राज देसाई, विनायक गोंदकर, सुशांत पाटील, रमेश पाटील,प्रविण जाधव ,आदित्य पाटील, प्रितम जाधव, अमित पाटील, समाधान पाटील ,अभि भांबुरे ,नागेश पाटील ,गोल्या पाटील  विश्वजीत पाटील ,उमेश पाटील, श्रीधर पाटील राहुल चव्हाण ,प्रमोद जाधव, गोरख भांबुरे उपस्थित होते.

Post a Comment

2 Comments