Daily Mahasatta

Daily Mahasatta

आम. सुधीरदादा गाडगीळ यांच्याकडून सिव्हील हॉस्पिटलच्या ऑक्सीजन प्लांटची पाहणी


सांगली (प्रतिनिधी)
पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी सदिच्छा भेट देऊन तेथे आमदार फंडातून निर्मित होत असलेल्या ऑक्सीजन जनरेशन प्लांटची पहाणी केली.

सदर ऑक्सीजन जनरेशन प्लांटसाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या आमदार फंडातून 90 लाख रुपयचा निधी मंजूर केला आहे. सदर प्लांट ऑक्सिजनची निर्मिती करत असल्यामुळे पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील गोरगरीब रुग्णांना याचा फायदा होणार आहे. प्रतिदिन 125 जम्बो सिलेंडर इतका ऑक्सीजन जनरेशन या प्लांट मधून निर्मिती होणार आहे .आजच्या पाहणीत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी ऑक्सीजन जनरेशन प्लांट च्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले आतापर्यंत या प्लांटचे 95 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार गाडगीळ यांनी दिल्या. सदर भेटी वेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदकिशोर गायकवाड उप वैद्यकीयअधीक्षक डॉ. सतीश अष्टेकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे,  कार्यकारी उपअभियंता अमर नलवडे, अभियंता मुजावर  चेतन माडगुळकर गणपती साळुंखे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments