Daily Mahasatta

Daily Mahasatta

रोटरी क्लब ॲाफ विटा सिटीच्या अध्यक्ष पदी रोहित दिवटे, तर सचिवपदी सागर म्हेत्रे


नुतन अध्यक्ष रोहीत दिवटे यांनी निवडीबद्दल आभार मानुन येणाऱ्या वर्षात रोटरीच्या परंपरेस साजेसे काम करु अशी ग्वाही दिली.  

विटा (प्रतिनिधी)
रोटरी क्लब ॲाफ विटा सिटीच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी आज रोजी संपन्न झाला. अध्यक्षपदी औषधव्यावसायीक रोहित दिवटे ,सचिवपदी कुक्कुटपालन व्यावसायिक सागर म्हेत्रे व खजिनदारपदी अमृतराव निंबाळकर यांची एकमताने निवड करण्यात आली.या शपथग्रहण सोहळ्याच्या अध्यक्षपदी कोल्हापुर येथील  प्रतिथयश संगणक व्यावसायीक, डिस्ट्रीक्ट ३१० चे भावी प्रांतपाल नासिर बोरसदवाला व नुतन सहाय्यक प्रांतपाल सांगलीचे  व्यावसायिक किशोर शहा  यांची प्रमुख उपस्थिती होती .
मावळते अध्यक्ष सुधिर बाबर व सचिव रोहित दिवटे यांनी आपल्या मनोगतानध्ये गेल्या वर्षभरामध्ये राबविलेल्या समाजोपयोगी अनेक उपक्रमांची माहिती देऊन नुतन पदाधिकाऱ्यांकडे धुरा सुपुर्द केली.
नासिर बोरसदवाला  यांनी आपल्या मनोगतामध्ये विटा रोटरी परीवाराच्या वतीने गेल्या सतरा  वर्षापासुन राबवीलेल्या रक्तदान,अपंगासाठी सायकली, जयपुरफुट, शहरांमध्ये बसविलेली विश्रांती  बेंच, शिक्षक दिन , वापरण्यायोग्य चांगल्या कपड्यांचे वितरण, महाविद्यालयांना पुस्तक प्रदान, विविध प्रबोधनपर व्याख्याने, विविध शाळांना शुद्ध पाणी यंत्रणा, डिजीटल क्लासरूम, वृक्षारोपण, शहर स्वच्छता अभियान यासारख्या विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या सातत्त्याबद्दल कौतुक केले.
नुतन अध्यक्ष रोहीत दिवटे यांनी निवडीबद्दल आभार मानुन येणाऱ्या वर्षात रोटरीच्या परंपरेस साजेसे काम करु अशी ग्वाही दिली.  शहा व प्रविण दाते यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रोटरी परीवारातील सदस्यांच्या परीवारातील दहावी व बारावी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी विटा रोटरीचे संस्थापक किरण तारळेकर,डॅा. राम नलवडे,सुरेश म्हेत्रे, संजय भस्मे, दिलीप चव्हाण, बालाजी  बाबर, कुमार चोथे, लक्ष्मणराव जाधव, नितीन पुणेकर ,निळकंठ  भस्मे, प्रफुल्ल निवळे, डॉ.  गौरव पावले  ,डॅा. अविनाश लोखंडे, रमेश लोटके, मिलिंद चोथे, सुशांत भागवत, सागर लकडे,अमित आहुजा,ॲड. सचिन जाधव, अमृतराव निंबाळकर, विकी आहुजा, दया बनसोडे, अमित आहुजा, अनिल देशमुखे, सागर म्हेत्रे ,पराग महाजन,विनायक लोटके,अनुप पवार,सचिन भंडारे या सदस्यांची परिवारासह  उपस्थिती होती. सुत्रसंचालन रमेश लोटके व सुशांत भागवत  यांनी केले. 

Post a Comment

0 Comments