Daily Mahasatta

Daily Mahasatta

उमेद ग्रुप च्या रक्तदान शिबिरात १७१ रक्तदात्यांचा सहभाग


कुपवाड  (प्रमोद अथनिकर)
      कुपवाड एम.आय.डी.सी. मधील उमेद ग्रुप मध्ये स्व. छाया नेमिचंद मालू यांच्या ६८ व्या जयंतीनिम्मित आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान करणारे रक्तदाते हे बहुतांश उमेद ग्रुपचे ऑफीस स्टाफ व कर्मचारी होते. उमेद ग्रुप व त्यांचे कर्मचारी अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन सामाजिक बांधिलकी कायम जोपासत असते.
     महापूर, भूंकप किंवा नैसर्गिक आपत्ती असो किंवा कोणत्याही मदतीस उमेद ग्रुप नेहमीच अग्रेसर असते. कोरोनाच्या या कालखंडात साथीच्या रोगामुळे रक्ताची अत्यंत निकड असल्यामुळे उमेद ग्रुप मध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन उमेद ग्रुपचे चेअरमन नेमिचंद मालू, सुभाष मालू, नितीन मालू, सतिश मालू, गणेश मालू, रवी मालू, अक्षय मालू, केशव मालू यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबीरास कुपवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांनी भेट दिली. सिध्दीविनायक रक्तपेढीचे पी.आर.ओ. जितेश पत्की, हिंदकेसरी प्रकाशबापू पाटील रक्तपेढीचे डॉक्टर मुजावर, डॉ. अनमोल मोरे, डॉ. पकंज बनसोडे व स्टाफ यांनी रक्तदान शिबीराचे काम पाहिले.
     तसेच हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उमेद ग्रुपचे धनाजी पवार, संतोष माने, स्वप्नील काटू, विनायक माने, कल्लाप्पा पडसलगीकर, लक्ष्मण पवार, राजू हणभर, राजू वळवडे आदीनी अथक प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments