Daily Mahasatta

Daily Mahasatta

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले ' त्यांचे मी आभार मानतो '


विटा (प्रतिनिधी)
वासुंबे ता. खानापूर येथे यशवंतशेठ चव्हाण (देशमुख) परिवाराच्या वतीने उभारलेल्या सांस्कृतिक भवनाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते आज रविवार ता. २९ रोजी संपन्न झाला. यावेळी आ. अनिलभाऊ बाबर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, स्व. राजारामबापू पाटील यांनी वासुंबे गावात येऊन जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यांचे भूमिपूजन केले होते. त्याच गावात माझ्या हस्ते आज या सभागृहाचे लोकार्पण करताना मला आनंद होत आहे. या गावाशी असलेल्या ऋणानुबंधाला आज उजाळा मिळाला. दुष्काळी भागातील नागरीक जेव्हा कामानिमित्त बाहेर जातो व तिथेच स्थायिक होतो तेव्हा आपल्या गावाचे काही देणे लागतो. या भावनेपोटी चव्हाण कुटुंबियांच्या वतीने हे सभागृह उभारण्यात आले. त्यांचे मी आभार मानतो, असे मत मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी आमदार अनिल भाऊ बाबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, बाबासो मुळीक, बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments