Daily Mahasatta

Daily Mahasatta

अखेर राज्यातील निर्बंध शिथिल, दुकाने रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार

मुंबई (प्रतिनिधी)

राज्यातील कोरोना रोखण्यासाठीचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यातील दुकाने, मॉल, उपाहारगृहे रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. तर धार्मिकस्थळे, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स बंद राहणार आहेत.
हे आदेश १५ ऑगस्टपासून लागू होणार आहेत. खाजगी कार्यालयांना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये २४ तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली. खाजगी व औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांचे व व्यवस्थापनांचे लसीकरण पूर्ण झाले असल्यास त्यांना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा राहणार आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्रतिदिन ७०० मे. टन किंवा व त्यापेक्षा जास्त ऑक्सिजन लागत असल्यास संपूर्ण राज्यात तात्काळ पूर्णपणे लॉकडाऊन घोषित करुन त्यानुसार कठोर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.

Must Read..

शिराळ्याची जगप्रसिद्ध नागपंचमी कशी होणार साजरी ? वाचा शासनाचे निर्देश

सांगलीत मातेने बस मध्येच दिला बाळाला जन्म

Post a Comment

0 Comments