Daily Mahasatta

Daily Mahasatta

डॉ. ज्ञानेश्वर हिप्परकर यांना छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार


सांगली : छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. ज्ञानेश्वर हिप्परकर यांचा कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील (बाबा) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सांगली (प्रतिनिधी) 
फाळके विश्वस्त संस्था, मुंबई या संस्थेमार्फत उद्योग व व्यापार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार वेफा मल्टीट्रेड प्रा. लि. सांगली या कंपनीचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर हिप्परकर यांना मिळालेबद्दल सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील (बाबा) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  
या प्रसंगी काँग्रेस अल्प संख्यांक विभागाचे जिल्हा अध्यक्ष देशभूषण पाटील, कुपवाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सनी धोत्रे, युवा नेते चेतन पाटील, ऋषीकेश मस्कर  कंपनीचे संचालक प्रशांत ओतारी, बबन मस्कर ,रविकुमार ढोमसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments