Daily Mahasatta

Daily Mahasatta

सौ. सुनीता देशमाने यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड


पेठ ( रियाज मुल्ला)
पेठ ता.वाळवा येथील सौ. सुनीताताई देशमाने यांची वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली.
      याप्रसंगी पत्र वितरण सोहळ्यासाठी पश्चिम महाराष्ट्र पक्षनिरीक्षक सौ. भारती ताई शेवाळे ,युवक राष्ट्रवादी राज्य सरचिटणीस अरुण आसबे, जिल्हाध्यक्ष अविनाश काका पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सौ. सुष्मिताताई जाधव, प्रदेश प्रतिनिधी कमल ताई पाटील जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील बापू ,वाळवा तालुका अध्यक्ष विजय पाटील (बापू) संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष संजय पाटील बापू व सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होते.

   सौ.सुनीताताई देशमाने या पेठच्या माजी सरपंच,10 वर्षे राजारामबापू पाटील सह. दूध संघाच्या संचालिका तसेच वाळवा तालुका  महिला राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यध्यक्षा आदी पदावर कार्यरत होत्या.

Post a Comment

0 Comments