Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिवसेनेतर्फे सांगली शहरातील शामराव नगरात आरोग्य शिबिर संपन्न

सांगली / प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथभाई शिंदे आणि संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानगुडे पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रात शिवसेनेने पूरग्रस्त नागरिकांच्या आरोग्य तपासण्या सुरू केल्या असून शामराव नगर येथील शिबिराला पूरग्रस्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. 

 खा. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, शिवसेना महापालिका क्षेत्र, शिवसेना वैद्यकीय कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने शामराव नगर येथील गजराज कॉलनी, महादेव कॉलनी या भागांमध्ये शिवसेनेच्या डॉक्टरांनी तपासणी करून आवश्यक ते औषध आणि हेल्थ किट, मास्क सॅनी टायझर यांचे नागरिकांना वाटप केले. यावेळी इतर विकार असणाऱ्या नागरिकांचीही तपासणी करण्यात आली. तसेच धनुर्वात रोधक इंजेक्शन आणि लेप्टोस्पायरोसिस पासून बचाव करण्यासाठीचे मलमही पूरग्रस्तांना वाटप करण्यात आले. 

   डॉ. शशिकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक डॉ किशोर ठाणेकर,शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभुते, उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, तालुकाप्रमुख गजानन मोरे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सुजाता इंगळे यांनी भेट देऊन नागरिकांना शिवसेना आपल्या बरोबर असल्याचे सांगितले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी स्थानिक शिवसैनिकांच्या बरोबरच कुपवाड शहर प्रमुख रुपेश मोकाशी,  राहुल हातगिनी, अभिमन्यू अपराध, राहुल आनंदे अमोल कांबळे, गणेश लोखंडे, डॉ बिडीवाले आदींनी महत्वपूर्ण सहकार्य केले.

साचून राहणारे पाणी,
दलदल प्रश्नी लवकरच बैठक
शामराव नगर हा कष्टकरी जनतेचा भाग असून या भागाला सातत्याने समस्यांना सामोरे जावे लागते. यापुढे शिवसेना याबाबत पूर्ण लक्ष देऊन नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न करेल. शामराव नगर परिसरात महापुरानंतर साचून राहणाऱ्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच महापालिकेच्या जलनिस्सारण आणि आरोग्य  विभागाच्या अधिकाऱ्यांना आणून ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेना प्रयत्न करेल असे आश्वासन यावेळी उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी उपस्थित नागरिकांना दिले. सुमारे 700 नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.

Post a Comment

0 Comments