Daily Mahasatta

Daily Mahasatta

शर्यतीतील बैलाच्या मृत्यूमुळे कोसळला दुःखाचा डोंगर


पेठ (रियाज मुल्ला):
     पेठ ता. वाळवा येथील शशिकांत बाळकृष्ण पाटील यांच्या बादल या लाडक्या बैलाचा मृत्यू झाला. बैलाच्या मृत्यूने शोकाकुल झाल्याने पाटील कुटुंबीयांनी त्याची दशक्रिया विधी अन उत्तरकार्य पूर्ण केले. बादलच्या मृत्यूने घरातील एकादा कर्ता व्यक्ती दगावल्याचे दुःख पाटील कुटुंबियांना झाला.बैलाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पाटील कुटुंबीयांनी त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले.
  
माणसाचे निधन झाले की त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले जातात त्याप्रमाणे पेठेतील शशिकांत पाटील यांनी त्यांच्या लाडक्या बैलाचे निधन झाल्यानंतर त्याचा दहावा विधी आणि उत्तर कार्य केले. बैलाच्या उपकाराची परतफेड म्हणून त्यांनी रानातच बादल चा दफन विधी केला.
   
सांगली -सातारा जिल्ह्यात नावाजलेल्या बैलापैकी एक बैल म्हणजे बादल होता. गेल्या काही वर्षांपासून पाटील कुटुंबीयांचा सदस्य असलेल्या या बादल बैलाने बऱ्याच ठिकाणी शर्यती जिंकून पेठ गावच्या च्या नावलौकिकात भर घातली होती.
  
मात्र काही दिवसांपूर्वी हा बैल आजारी पडला अन काळाने बादल ला  पाटील कुटुंबियांपासून  हिरावून नेले.आज या बैलावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी वाळवा तालुका बैलगाडी शर्यतीचे अध्यक्ष दीपक कदम (डी के), कृष्णात पाटील (एल के), विजय रं. पाटील, उदय पाटील, मधुकर तवटे, बजरंग वाघ, आदी मान्यवर तसेच जय हनुमान मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments