Daily Mahasatta

Daily Mahasatta

सौ. आशालता उपाध्ये हायस्कुलच्या विद्यार्थिनींचे एनएमएमएस परीक्षेत यश

कुपवाड (प्रमोद अथणीकर)
नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था संचालित, सौ.आशालता
उपाध्ये गर्ल्स हायस्कुल, कुपवाड शाळेच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. नुकत्याच झालेल्या शालेय एएमएमएस ( National Merit Cum Scholarship)  या देशपातळीवरील स्पर्धा परीक्षेमध्ये शाळेच्या विद्यार्थीनींनी  गगणभरारी घेतली. शाळेची कु.मनस्वी गणेश व्हनकडे या विद्यार्थीनीची एएमएमएस परिक्षा गुणवत्ता यादी मध्ये निवड होऊन ती शासनाच्या ४८ हजार रुपये शिष्यवृत्तीस पात्र झाली. तसेच कु.मृणाल शांतिनाथ चौगुले, कु.भाग्यश्री शिवाप्पा मगदूम, कु. नंदिनी रमेश चव्हाण, कु. शिवानी बाबासाहेब बुगे, कु. निकिता रमेश चव्हाण, कु. नम्रता दिपक कांबळे, कु. पुनम महादेव माने, कु. इशा सचिन कांबळे, कु.आरती बालाजी लोणारे या विद्यार्थीनींनी उत्तीर्ण होत कौतुकास्पद कामगिरी केली.

सर्व यशस्वी विद्यार्थिनींचा व त्यांच्या पालकांचा शाळेमार्फत व संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये,  माजी मुख्याध्यापक महावीर बिरनाळे, शाळेचे मुख्याध्यापक शिरीष चिरमे, कुंदन जमदाडे, पर्यवेक्षक अनिल चौगुले, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थीनींना संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये, संचालक सुरज उपाध्ये, संचालिका कांचन उपाध्ये, पूनम उपाध्ये यांची प्रेरणा मिळाली. तसेच शिक्षक सौ. एन. एस.वाडकर, श्री.डी.एम.माळी, श्री.एस.एस.पाटील, श्री.ए.एन.भोसले, सौ.अश्विनी पाटील या सर्वांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.  तसेच फॉर्म भरणेपासून ते शिष्यवृत्ती मिळेपर्यत कामकाज पाहणारे स्नेहल लाड व अभय उपाध्ये, सर्व गुणवंत विद्यार्थीनी, मार्गदर्शक पालक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांचे हार्दिक अभिनंदन.  या यशाचे कुपवाड व कुपवाड परिसरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments