Daily Mahasatta

Daily Mahasatta

विटेकरांना 50 हजार अंड्याची मदत देणारा देवदूत हरपला


विटा ( प्रतिनिधी)
कोरोनाच्या भीषण संकटात विटा परिसरातील कोरोनाग्रस्त रुग्ण तसेच सामान्य लोकांसाठी पन्नास हजार अंड्यांचे वाटप केले. मात्र याबाबत आपले नाव कुठेही घेऊ नका किंवा अंडी वाटताना माझे फोटो देखील नको अशी भूमिका घेणारा खराखुरा देवदूत काळाच्या पडद्याआड गेला आहे. फैय्याजअहमद लतीफ मुल्ला वय 46 रा. भाळवणी ता. खानापूर असे या देवदूताचे नाव आहे.

देशभरात पोल्ट्रीकिंग या नावाने प्रसिद्ध असलेल्या कै. लतीफ शेठ मुल्ला यांचा मुलगा फैय्याशेठ यांचे रविवारी रात्री हृदयविकाराच्या झटका आला. त्यांना तातडीने विटा येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोल्ट्री किंग लतीफशेठ यांच्या निधनानंतर पोल्ट्री फार्म चा संपूर्ण कार्यभार फैय्याशेठ चालवत होते. तसेच विटा येथील रोशन ए आलम उर्दू शाळेचे ते अध्यक्ष होते. एक दानशूर व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती.
       कोरोनाच्या काळात शहरातील कोरोनाग्रस्त रुग्ण तसेच सामान्य लोकांसाठी एक हजार अंडी वाटप करण्यात यावीत अशी मागणी आम्ही विटेकर कल्चरल ग्रुप च्या वतीने त्यांना करण्यात आली होती. यावेळी  एक हजार नव्हे तर 50 हजार अंडी कोरोनाणा ग्रस्त पेशंट आणि गोरगरीब लोकांना वाटावी, यासाठी उपलब्ध करून दिली. तसेच अंडी वाटप करताना आपले नाव किंवा आपल्या फोटोचा वापर करू नका, असे सूचना देखील त्यांनी केल्याचे सांगण्यात येते. ज्युनिअर पोल्ट्री किंग फैय्याशेठ यांच्या निधनाने भाळवणी, विटासहा सांगली जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
............................................
देवदूत हरपला..

कोरोनाच्या काळात डॉक्टर, नर्स, पोलीस यांच्यासह अनेकांनी समाजाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. यामध्ये फैय्याज सेठ यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. आम्ही विटेकर ग्रुप च्या वतीने त्यांना कोरोनाग्रस्तांसाठी एक आंडयाची मागणी केली होती. परंतु त्यांनी पन्नास हजार अंडी मोफत उपलब्ध करून दिली आणि आणखी लागतील तेवढे सांगा, असे सांगत आपल्या दानशूरपणा चे दर्शन घडवून दिले. आमच्यासाठी ते मार्गदर्शक हितचिंतक आणि खरेखुरे देवदूत होते. त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली.

विकास जाधव,
आम्ही विटेकर कल्चरल ग्रुप, विटा


must read..Post a Comment

0 Comments