Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुसूमताई नायकवडी यांना स्मृतीदिनी अभिवादन

वाळवा (रहिम पठाण)
आदरणीय कुसूमताई नायकवडी (माई साहेब) यांचा द्वितीय स्मृतीदिन हुतात्मा शिक्षण, उद्योग समुह व सर्व चळवळीच्या वतीने अत्यंत साधेपणाने कोणतीही गर्दी न करता साजरा करणेत आला. कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्मृती दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द करणेत आले. १७ जुलै २०२१ स्मृती दिनी पहाटे ५.०० पासून अनेक मान्यवरांनी समाधी स्थळावर पुष्पांजली अर्पण केली.

 मा. वैभव काका नायकवडी यांनी सकाळी पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी व स्व. कुसूमताई नायकवडी (माई) समाधी स्थळावर उपेक्षित घटकाच्या चळवळीचे प्रतिनिधी, धरणग्रस्त संघटना, साखर कामगार संघटना, पाणी संघर्ष चळवळ, ऊस उत्पादक शेतकरी यांचे प्रतिनिधी या नात्याने पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. हुतात्मा किसन अहिर विद्यालय येथे ऑनलाईन जाहिर सभेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे सुरुवातीस आदरणीय कुसूमताई नायकवडी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना प्रा. विशाखा कदम म्हणाल्या, गंगे सारख्या निर्मळ व हिमालयासारखे उत्तुंग आई वडिलांना आपण सर्वजण पोरके झाले आहोत. आदरणीय कुसूमताई नायकवडी यांचे कुटुंब हे सर्वसामान्य व सरळ होते व डॉ. नागनाथअण्णाचे कुटुंब देशासाठी स्वातंत्र्य चळवळ उभे करणारे, स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगणारे अशा दोन विभन्न कुटुंबाचा माईने लग्नानंतर स्विकार करुन नागनाथअण्णा सारख्या वादळाशी 88 वर्षे साथ दिली त्यामध्ये त्यांनी कधीही तक्रार केली नाही. त्यांनी आपल्या जीवनातून आदरयुक्त धाक व दरारा कायम ठेवला.

प्रा. जयप्रभा घोडके म्हणाल्या, आदरणीय कुसूमताई नायकवडी यांनी जिजामाता यांचा आदर्श आपल्या सामाजिक जीवनात जपला. त्याच्या जीवनाचा अभ्यास केला तर अनेक प्रसंगामध्ये त्यांच्या राहणीमानावर जिजामातेचे संस्कार आढळून येतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचेप्रमाणे त्यांनी आपल्या कुंटुंबातील सर्व मुले सुसंस्कृत व विचारवंत घडविली. अण्णा व माईच्या नंतर सुध्दा त्याच विचाराने मा. वैभव काका व त्यांचे सर्व कुटुंबिय शिक्षण, सहकार व क्रिडा क्षेत्रात काम करीत आहेत. माई या आदर्श गृहिणी, उत्तम वक्त्या, आदर्श शिक्षीका, उत्तम लेखिका व डॉ. नागनाथअण्णांच्या सर्व चळवळीचे महिला आघाडीचे नेतृत्व करुन आपले आगळे वेगळे जीवन समाजासाठी जगल्या. हाच आदर्श त्यांच्या स्मृतीदिनी आपण घ्यावा.

अध्यक्षपदावरुन बोलताना मा. वैभव काका नायकवडी म्हणाले, सहयाद्री सारखे भक्क्म आई वडिल आम्हाला लाभले. परंतु त्यांनी आमच्या पेक्षा देश सेवा, समाज सेवा यासाठी उपेक्षित समाजाचे •पालकत्व स्विकारुन त्यांना सुखी व समाधानी करणेचा प्रयत्न केला. आईचा सहवास आम्हा भावडांना लहानपणी मिळाला. अण्णांनी समाज कारणासाठी काम करताना आमच्या विचारांना आकार देण्याचे काम केले. आईचे बाबतीत वक्तशिरपणा, स्वच्छता, प्रामाणिकपणा, उत्तम प्रशासक हे गुण स्वतः  आचरणात आणून त्या विचाराने विद्यार्थ्यांना शिक्षकांना घडविणेचे काम केले. अण्णांच्या पूर्ण आयुष्यात त्यांना कुटुंबापासून देश सेवेसाठी पूर्ण वेळ मोकळीक दिली. त्यावेळी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी शामराव आप्पा, काकी आणि आई यांनी सांभाळली. परंतु नागनाथ अण्णांच्या सारखा सहयाद्री ऐवढे मोठे व्यक्तीमत्व केवळ आमच्या कुटुंबाचा आधार न बनला महाराष्ट्रातील सर्वांचे आधार बनले. त्यांचा आदर्श नवीन पिढीला सांगून भविष्यातील त्यांच्या विचारांची नवीन पिढी निर्माण करणे हेच आपले सर्वांचे कर्तव्य आहे असे आव्हान केले.


प्रा. एस. आर. पाटील सर म्हणाले, आदरणीय कुसूमताई नायकवडी यांनी जिजामाता विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून काम करताना स्वतःचा पगार काही काळ घेतला नाही हा त्याग आपण कोणीही विसरु नये. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. चिखले सर यांनी केले. सुत्रसंचलन श्री. एम. डी. कांबळे व श्री. के. बी. पाटील सर यांनी केले.

या कार्यक्रमासाठी हुतात्मा कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबुराव बोरगांवकर व त्यांचे सर्व सहकारी संचालक, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच हुतात्मा दुध संघाचे व्हाईस चेअरमन भगवानभाऊ पाटील व त्यांचे सर्व सहकारी संचालक, अधिकारी, कर्मचारी, हुतात्मा सहकारी बँकेचे चेअरमन किरणदादा नायकवडी व त्यांचे सर्व सहकारी संचालक, अधिकारी, कर्मचारी, हुतात्मा बझारचे चेअरमन दिनकर बाबर व त्यांचे सर्व सहकारी संचालक, अधिकारी, कर्मचारी, क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी व त्यांचे सर्व सहकारी प्राध्यापक वर्ग, हुतात्मा किसन अहिर विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. खणदाळे व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी, जिजामाता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. चेंडके मॅडम व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थीनी, वारणा धरणग्रस्त संघटनेचे रफिक मुल्ला, उमेश कानडे व त्यांचे सर्व सहकारी, आटपाडी पाणी परिषदेचे माने गुरूजी करंजे, दत्तात्रय जाधव कराड, प्रा. सुभाष पाटील, माजी मुख्याध्यापक वायदंडे सर, आर. डी. पाटील, प्रा. बाळासाहेब नायकवडी, यशवंत बाबर, अरूण यादव, अशोक खोत, शरद खोत, विश्वास थोरात, आनंदराव पाटील, बाळासाहेब पाटील, नंदू पाटील, सावकर कदम, कॉन्ट्रॅक्टर वसंत वाजे, विश्वास मुळीक, डॉ. नागनाथअण्णांचे कुटुंबिय, मा.गौरवभाऊ नायकवडी, सौ. स्नेहल नायकवडी, विरधवल नायकवडी, केदार नायकवडी, सौ.नंदिनी नायकवडी, डॉ. सुरेश कदम, या कार्यक्रमास हुतात्मा किसन अहिर नागरी पतसंस्थेच चेअरमन श्री. अजित वाजे व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. कार्यकर्ते श्री. गंगारामभाऊ सुर्यवंशी आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments