Daily Mahasatta

Daily Mahasatta

...तर शहरातील रुग्णवाढीला जत नगरपरिषद जबाबदार?

आठवडा बाजार भरवून जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाची पायमल्ली

जत (प्रतिनिधी) : कोरोनाचे पार्श्वभूमीवर जिल्हाप्रशासनाने जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश देऊनही जत शहरात मात्र जत नगरपरिषद व तालुका प्रशासन यानी आठवडा बाजार भरवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली केली आहे. 

 कोरोनाचे पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी  अभिजीत चौधरी यांनी जिल्हयातील सर्वच तालुक्यातील आठवडी बाजार न भरविण्याचे आदेश  प्रशासनाला दिले असतानाही जत शहरात मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला जत नगरपरिषदेने गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे मंगळवारी भरविण्यात येत असलेला आठवडी बाजार भरला होता.

या आठवडी बाजारात व्यवसाईक व  बाजारकरी यांच्याकडून कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नव्हते. व्यवसाईक, बाजारकरी तसेच मोटारसायकलवरुन जा ये करणारे वाहनचालक तोंडाला मास्क न लावता बाजारभर फिरत होते.पोलीस प्रशासन तर असून नसल्यासारखे वागत होते.कोरोना नियमांची पायमल्ली करणारेवर ते कोणतीही कारवाई करताना दिसत नव्हते याचीच चर्चा सर्वत्र होत होती.

 जत शहरात कोरोनाची परिस्थिती आता कुठे आटोक्यात येऊ लागली असतानाच परत कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांची संख्या वाढू लागल्याने व याला सर्वस्वी जत नगरपरिषद व  पोलीस प्रशासन हेच जबाबदार आहे. त्यांच्यावर जिल्हाप्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी जत शहरवासियातून होत आहे.

Post a Comment

0 Comments