Daily Mahasatta

Daily Mahasatta

उप प्राचार्या सौ. फडतरे यांचाप्रतिकदादांच्या हस्ते सत्कार

विटा  ( प्रतिनिधी )

रयत शिक्षण संस्थेच्या विटा हायस्कुल विटा व संजय भगवानराव पवार ज्यूनियर कॉलेज विटा च्या उप प्राचार्यपदी सौ. पुष्पलता ज्ञानदेव फडतरे यांची सन्माननीय निवड झाल्याबद्दल राज्याचे युवा नेते प्रतिकदादा जयंतराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

उपप्राचार्या सौ. फडतरे यांनी आपल्या शैक्षणिक कामाची सुरुवात उपशिक्षका म्हूणन श्री सिद्धनाथ विद्यालय खरसुंडी येथून केली. त्यांनी ३३ वर्षे सेवा बजावली असून त्यांनी आपल्या शैक्षणीक जीवनात अनेक शासकीय अधिकारी, डॉक्टर,  फार्मासिस्ट, कॅर्पोरेट कंपनी अधिकारी घडवले आहेत. गरीब विद्यार्थी हाच केंद्र बिंदू मानून त्यांनी काम केले. सामाजीक सेवेत अग्रेसर राहीलेल्या सौ . फडतरे मॅडमनी  कोल्हापूर - सांगलीच्या महापुरावेळी संपूर्ण कुटुंबासह झोकून देवून लाखो रुपयाची औषधे स्वखर्चातून पुरग्रस्तांना वाटून सामाजीक बांधीलकी जोपासली होती .  भामारागड मधील पूर परिस्थिती मध्ये अनिकेत आमटे यांच्याकडे औषधे पाठवली होती .निसर्ग टिकला पाहिजे यासाठी स्वतःच्या मुलांच्या लग्नामध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला एक झाड देवून अभिनव काम केले . त्यांनी यावर्षी ६०० झाडें लावली आणि जगवली.
               
यावेळी राष्ट्रवादीचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, प्रदेश मीडिया सेलचे बिरु केसकर, युवक राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष हरी माने, विटा शहर अध्यक्ष सिद्धार्थ शितोळे , आशिष पवार, युवाउद्योजक जयदीप देसाई, ज्ञानदेव फडतरे हे मान्यवर उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments