Daily Mahasatta

Daily Mahasatta

पेठ गाव पूर्णतःबंद राहणार

पेठ (रियाज मुल्ला)

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज झालेल्या बैठकीत पेठ ग्रामपंचायतीने पुढील आदेश येईपर्यंत पेठ गाव  पूर्णतः बंदचा निर्णय घेण्यात आला असून रविवार दिनांक 18 तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत बैठकीत ठरले आहे.विनाकारण फिरणारे व मास्क चा वापर न करणाऱ्या वर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
आज अखेर पेठेत 94 रुग्ण ऍक्टिव्ह असून रोज 10 च्या आसपास रुग्ण सापडत असल्याने तसेच कोरोना रुग्णांच्या घरातील व्यक्ती राजरोसपणे बाहेर फिरताना आढळत असल्या कारणाने कोरोनाला आळा बसावा या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.
  
डेअरी साठी सकाळी 7 ते 9 व सायंकाळी 7 ते 9 ची वेळ देण्यात आली असून फक्त मेडिकल व दवाखाने  या अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत.
   माजी जि. प.सदस्य सम्राट महाडिक(बाबा) यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक संपन्न झाली. याप्रसंगी जि. प. सभापती जगन्नाथ माळी, उपसरपंच चंद्रकांत पवार, मा. उपसरपंच शंकर पाटील, सर्कल सुरेश शेळके, तंटामुक्तीचे अध्यक्ष धनपाल माळी, मा. उपसरपंच अमीर ढगे, ग्रामसेवक एम.डी.चव्हाण,तलाठी के. बी.मुलाणी, कृष्णा बॅंकेचे संचालक नामदेव कदम, संपत पाटील,गोरख मदने,बरकत जमादार,डी. के. कदम, विकास पेठकर, अशोक माळी,नामदेव भांबुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments