Daily Mahasatta

Daily Mahasatta

कर्मवीर पतसंस्थेकडून पुरग्रस्तांना ५१ हजाराची मदत


: १००० पुरग्रस्तांना अन्नदान

सांगली (प्रतिनिधी)
:- सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये नुकतेच पुराने चैमान घातले, अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीने व्यापार शेती आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोना पाठोपाठ आलेल्या या संकटाने सामान्य माणुस पुर्णपणे तळितगात्र झाला आहे. या परिस्थितीतून त्याला उभे करणे एक माणुस म्हणुन आपले कर्तव्य आहे. आणि कर्मवीर पतसंस्था सांगली ही संस्था या कामी सदैव मानवतेच्या भावनेने अग्रभागी राहीली आहे, असे मत रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

या पुरपरिस्थितीच्या पार्श्वभुमीवर कर्मवीर पतसंस्थेकडून रु.५१ हजार च्या मदत निधीचा चेक दक्षिण भारत जैन सभेच्या आपत्ती निवारण निधीस कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगाँडा पाटील यांच्या हस्ते प्रदान केला. या शिवाय पुरपरिस्थितीच्या पार्श्वभुमीवर संस्थेच्या वतीने उदगांव चिंचवाड आगर व जयसिंगपूर परिसरातील विविध ठिकानी निवारा घेतलेल्या १००० पुरग्रस्तांना जेवणाची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

यावेळी श्री. रावसाहेब पाटील म्हणाले की, माणसाला संकटात मदत करण्यामध्येच खरी माणुसकी आहे. अशा प्रसंगी मिळालेली लहानात लहान मदत सुद्धा एखादयाचे आयुष्य उभे करण्यास मोलाची ठरु शकते. कर्मवीर पतसंस्था ही अशा वेळी सदैव समाजासाठी अग्रेसर राहील असे त्यांनी सांगितले.

या वेळी संस्थेच्या व्हाईस चेअरमन श्रीमती भारती चोपडे संचालक अँड. एस. पी. मगदूम डॉ. नरेंद्र खाडे, डॉ. रमेश ढबू. श्री. वसंतराव नवले, श्री. ओ. के. चौगुले (नाना). श्री. लालासाहेब थोटे सौ. ललिता सकळे तज्ञ संचालक डॉ. एस. बी. पाटील ( मोटके ) अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदुम यांचे सह संस्थेचे कार्यकारी

सल्लागार श्री. सुहास मगदूम, उदगांवच्या सरपंच सौ. कलिमुन नदाफ, ग्रामपंचायत श्री. सलिम नदाफ, अरुण कोळी, दिलीप कांबळे, सदस्या सौ दिपिका कोळी, सौ. रुपाली सुतार श्रीमती रुक्मीनी कांबळे, सौ. सावित्री मगदूम, बाळासाहेब कोळी. राजू मगदूम, बाचू बंडगर, अमोल माने, अभिजीत चौगुले, संजय सासणे, अभिजीत खोत प्रज्योत चौगुले उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments