Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिराळा तालुक्यात बिबट्याचा शेळी वर हल्ला

शिराळा (विनायक गायकवाड) : भाटशिरगाव (ता.शिराळा) येथील सांगुळे वस्तीवर सुखदेव सांगुळे यांच्या चार महिन्याच्या गाभण शेळीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले.

ही घटना सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. डॉ. वैभवकुमार राजमाने, वनविभागाचे संभाजी पाटील  यांनी पंचनामा केला. यावेळी पोलिस पाटील सचिन गुरव, शेळी मालक सुखदेव श्रीपती सांगुळे उपस्थित होते. या वस्तीवर अनेक वेळा पाळीव जनावरांच्यावर हल्ले झाले असून बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments