Daily Mahasatta

Daily Mahasatta

कडेगावच्या नेत्यांना अस्तित्व दाखवण्याची वेळ : युवानेते शरद लाड

: पृथ्वीराज देशमुख यांचे नाव न घेता केली खोचक  टिका 

कडेगाव (प्रतिनिधी )
राष्ट्रवादी हा पक्ष कुंडल पुरताच मर्यादित आहे अशी टीका भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी केली  होती . याच अनुषंगाने शरद भाऊ लाड यांनी खरपूस समाचार घेत आता अस्तित्व दाखवायची वेळ आलेली आहे,  असा खोचक टोला भाजपाचे सांगली जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख यांचे नाव न घेता लगावला आहे. ते  २९ जुलै रोजी तालुक्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या नेवरी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावेळी बोलत होते .

राष्ट्रवादी पक्ष हा कुंडल पुरता मर्यादित आहे. राष्ट्रवादी हा पक्ष काही करू शकत नाही. हा पलुस कडेगाव मतदार संघातील राष्ट्रवादी पक्ष हा आम्ही आमच्या मुठीत बांधून ठेवलेला आहे. पण आता अस्तीत्त्व दाखवायची वेळ आलेली आहे . जमिनी वर मुंगीला सुद्धा अस्तित्व असतं. आपण तर जीवाभावाची माणसे होतो. प्रत्येकाला कमी लेखायच आणि त्यांचे कडुन अपेक्षा करायची की तो दबावाखाली गप्प राहिला पाहिजे . परंतु आता हे दिवस संपलेत प्रत्येकजण स्वयंभू झालेला आहे, असे मत कडेगाव पलूस मतदार संघाचे राष्ट्रवादी पक्षाचे युवानेते शरद लाड यांनी व्यक्त केले .

पुढे बोलताना ते म्हणाले की तालुक्यातील  प्रत्येकजण कष्टाणे शेती करतोय. त्यातून तो पैसे मिळवून शेती चांगल्या पद्धतीने करतोय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कामाला दाम व शेती मालाला भाव मिळाला पाहिजे तो त्याच्या हक्काचा आहे अन् तो जर मिळाला नाही तर हा शेतकरी माणूस पेटून उठणार आहे. पेटूण उठलेल्या माणसाला आम्ही कोणत्या तोंडाने व किती वर्षे सागंणार आहे तू गप्प बस . यावरूनच असे स्पष्ट होते की कडेगाव तालुक्यातील लोकांची भूमिका उफाळून येऊ लागली आहे. जी लोक पहिल्यापासून राष्ट्रवादीचीच आहेत परंतु काही कारणास्तव तडजोडिच्या निमित्ताने भाजपा मध्ये गेली परंतु मुळचा पिंड हा राष्ट्रवादिचा कायम राहिला अस असताना सुद्धा आमंच नात कधी तुटल नाही. आम्ही प्रत्येकजण एकमेकाला मदत करत राहिलो. त्यामुळेच कडेगाव तालुक्यातील जनता राष्ट्रवादीत प्रवेश करु लागली व पक्ष वाढू लागला आहे. कारण हा पक्ष सर्वसामान्यांचा व स्वाभिमानी आहे  व स्वाभिमानाला कधिच ठेच लागणार नाहि असा विश्वास शरद लाड यांनी व्यक्त केला .

Post a Comment

0 Comments