Daily Mahasatta

Daily Mahasatta

डॉ. घोडके फर्टिलिटी सेंटर मध्ये अपत्य प्राप्तीचा आनंद


सांगली (प्रतिनिधी)
येथील डॉ. घोडके फर्टिलिटी सेंटरमध्ये दोन जोडप्यांना सुमारे २० व २८ वर्षांनंतर अपत्यप्राप्तीचा लाभ मिळाला. कदम दाम्पत्य हे लग्नानंतर गेली २० वर्षे अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करीत होते. त्यांना अपत्य होणार नाही, असे विविध ठिकाणी सांगण्यात आले होते. परंतु अन्य रुग्णांच्या सांगण्यावरून त त्यांनी अखेरचा प्रयत्न म्हणून गेल्यावर्षी  डॉ. घोडके यांच्याकडे उपचार घेण्यास ने सुरुवात केली. डॉ. घोडके यांनी दुर्बिणीद्वारे तपासणीनंतर सौ. कदम यांच्या गर्भाशयाच्या पोकळीवर शस्त्रक्रिया केली. त्यानंतर टेस्टट्यूब बेबीची प्रक्रिया करण्यात आली आणि  लग्नानंतर २४ वर्षांनंतर कदम दाम्पत्यांना अपत्य झाले.

सौ. अश्विनी याही अपत्यासाठी प्रयत्न करीत होत्या. त्यांनीही डॉ. घोडके यांच्याकडे उपचार घेण्यास सुरुवात केली.  अपत्यहीन जोडप्यांना लाभ झाला अखेर सौ. अश्विनी यांना ४१ व्या वर्षी लग्नानंतर २० वर्षांनी जुळ्या अपत्यांचा लाभ झाला. त्याचबरोबर हेरले दाम्पत्य हेही गेली २८ वर्षे अपत्यासाठी प्रयत्न करीत होते. सौ. हेरले यांचे वय ४८ झाले आहे. त्यांनी डॉ. घोडके फर्टिलिटी सेंटरमध्ये उपचार घेतले. त्यांच्यावरही टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाचा प्रयोग करण्यात आला. पाचव्या महिन्यात सौ. हेरले यांचे गर्भाशयाचे तोंड अचानक उघडले. डॉ. घोडके यांनी त्यांच्या गर्भाशयाच्या तोंडाला टाके घालून गर्भधारणा काळजीपूर्वक पुढे नेली. तब्बल २८ वर्षानंतर त्यांना अपत्य प्राप्त

Post a Comment

0 Comments