Daily Mahasatta

Daily Mahasatta

महापौरांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळ मंत्रालयात दाखल


सांगली (प्रतिनिधी)
सांगली शहरात कृष्णा नदीस आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर, पूरचे पाणी ओसरल्यानंतर करावयास लागणाऱ्या उपायोजना साठी लागणारा निधी तात्काळ उपलब्ध व्हावा, यासाठी सांगलीतून आज निधी मागणी साठी शिष्टमंडळ  मा. ना. श्री.अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री तथा वित्त, नियोजन उत्पादन शुल्क मंत्री, महाराष्ट्र राज्य, ना. मा.जयंतरावजी पाटील जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जिल्हा सांगली मा.ना.श्री.विश्वजीत कदम, सहकार, कृषी, सामाजीक न्याय, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मा.ना.श्री.एकनाथ शिंदे,नगर विकास तथा सार्व.  बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना भेटले. शिष्टमंडळाने सांगली शहराचे झालेले नुकसान भरून निघावे, यासाठी शासन स्तरावरुन तातडीच्या दुरुस्तीसाठी रुपये 90.92 कोटी  अनुदान उपलब्ध व्हावे अशी मागणी करणारे पत्र  महापौर दिग्विजय सूर्यवंशी, व उपमहापौर मा. उमेश पाटील यांनी दिले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, गट नेते मैनुद्दीन बागवान, युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments