Daily Mahasatta

Daily Mahasatta

स्वीकृत नगरसेवक पदासाठी मिथून भिसे यांचा अर्ज दाखल

जत (सोमनिंग कोळी) : जत नगरपालिकेच्या स्विकृत नगरसेवक पदासाठी भाजपकडून माजी आमदार विलासराव जगताप यांचे कट्टर समर्थक भाजपचे शहराध्यक्ष आण्णा भिसे यांचे बंधू युवा नेते मिथून भिसे यांनी आपला उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांच्याकडे दाखल केला आहे.  शुक्रवार ९ जुलै रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. भाजपकडून या पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्यामुळे आता केवळ मिथून भिसे यांच्या निवडीच्या घोषणेची औपचारिकता बाकी राहिली आहे.

२०१७ साली झालेल्या जत नगरपालिकेच्या
निवडणुकीत कांग्रेसचे ७, राष्ट्रवादी  ६ तर भारतीय जनता पार्टीने ७ जागांवर विजय प्राप्त केला होता. कांग्रेस कडून लोकनियुक्त नगराध्यक्षा विजय झाल्याने नगरपालिकेत सत्ता स्थापन झाल्यानंतर त्यांच्या वाट्याला एक, भारतीय जनता पार्टीला एक स्वीकृत नगरसेवक पद आले होते.

कांग्रेसकडून एका स्विकृत नगरसेवक पदावर आमदार विक्रमदादा सावंत यांचे कट्टर समर्थक निलेश बामणे यांची वर्णी लावली होती.   भाजपडून एका जागेवर माजी आमदार विलासराव जगताप यांचे विश्वासू व निवडणुकीत पालिकेच्या सभागृहात दोन सदस्य निवडून पाठवण्यात सिहाचा वाटा असणारे माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत यांना संधी दिली होती.
 
३ वर्षांनी नवीन युवकांना संधी देण्यासाठी मा. आम जगताप यांच्या आदेशाने नगरसेवक उमेश सावंत यांनी १७ जून रोजी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्याकडे सुपूर्त केला होता.त्यानंतर प्राताधिकारी प्रशांत आवटे यांनी जत नगरपरिषदेतील स्विकृत नगरसेवक पदासाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केला होता. त्यानुसार भाजपकडून मिथून भिसे यांनी भाजपडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments