Daily Mahasatta

Daily Mahasatta

शाब्बास... रस्त्यावर सापडलेले ६० हजार परत दिले; पोलीस म्हणाले ओळख पटवा आणि घेऊन जा

इस्लामपूर :  सचिन जाधव यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णत पिंगळे यांनी त्यांचा पोलीस विभागाच्या वतीने सत्कार केला.

इस्लामपूर (हैबत पाटील)
एका बाजूला सध्या कोरोना आणि महापूर याचा समाज मनावर जबरदस्त  आघात होत असताना दुसऱ्या बाजूला इस्लामपूर येथील शास्त्री नगर मध्ये राहणाऱ्या  सचिन रामचंद्र जाधव यांच्या प्रामाणिकपणाचे  दर्शन झाले. सचिन चे इस्लामपूर शास्त्रीनगर वाघवाडी रोडवर त्रिमुर्ती पेंटस नांवाचे दुकान आहे.  गेली ३० वर्षापासून व्यवसाय करीत आहेत. दिनांक - ३०.०७.२०२१ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्यासुमारास सचिन रामचंद्र जाधव हे उरूण : इस्लामपूर येथील डॉ. विश्वास पाटील-खेडकर यांचे दवाखान्यातून परत शास्त्रीनगर, इस्लामपूर येथील निवासस्थानाकडे जाताना त्यांना डॉ. वैभव राजे हॉस्पीटलसमोर रोडवर रोख रक्कम ६०,००० /- रूपये सापडले. त्यावेळी त्यांनी रोख रक्कमबाबत आजूबाजूला खात्री केली असता त्याबाबत कोणीही मिळून आले नाही. त्यानंतर सदरची ६०,००० /- रूपये रोख रक्कम उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, इस्लामपूर येथे जमा केली आहे. सध्याच्या कोरोना या जागतिक महामारीचे काळात कोणताही व्यवसाय पुर्ण क्षमतेने चालू नसताना आर्थिक टंचाई असतानाही इस्लामपूर येथील व्यावसायिक सचिन जाधव यांनी प्रामाणिकपणे सदरची रक्कम उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, इस्लामपूर येथे जमा केलेली आहे. त्यांच्या या प्रामाणिकपणाबददल उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, इस्लामपूर येथे पुष्पगुच्छ देवून सत्कार
करण्यात आला. त्यांचे प्रामाणिकपणाचे दर्शन यापूर्वीही झालेले आहे. त्यांनी यापूर्वीही दोन वेळा त्यांना सापडलेली रक्कम संबंधित व्यक्तींना प्रामाणिकपणे परत केलेली
आहे. तरी सचिन रामचंद्र जाधव रा. इस्लामपूर यांना डॉ. वैभव राजे हॉस्पीटल, इस्लामपूर यांचे हॉस्पीटलचे समोर रस्त्यावर मिळालेली रोख रक्कम रूपये ६०,००० /- ही ज्या व्यक्तीची असेल त्या संबंधीत व्यक्तीने त्या रोख रकमेची खात्री देणेकरीता  कृष्णात पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, इस्लामपूर विभाग यांचेशी संपर्क साधावा व पैसे घेवून जावेत असे आवाहन पोलिसांच्या वतीने  करणेत आले  आहे.

Post a Comment

0 Comments