Daily Mahasatta

Daily Mahasatta

निशिकांत (दादा) युथ फाऊंडेशन धावले हर्षालीच्या मदतील

वाळवा (रहिम पठाण) : मसुचीवाडी गावची चिमुकली हर्षाली किडनीच्या अजाराने त्रस्त आहे.त्यामुळे तिच्या दोन्हीही किडनींचे प्रत्यारोपन करणे गरजेचे असल्याने तिला मुंबई येथे केईएम हाॕस्पीटल मध्ये दाखल केले आहे.

या शस्रक्रीयेसाठी खर्च खूप आहे व तिच्या घरची परीस्थिती बेताची आहे त्यामुळे खर्च करने त्यांना अशक्य आहे. अशा वेळ सर्वाना मदतीचे आव्हान करण्यात आले आहे. इस्लामपूर नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचे वाढदिवसनिमित्ताने रक्तदान शिबीर व कोविड योध्दा सन्मान अशा कार्यक्रम नियोजनासाठी मसुचीवाडी येथे सचिन कदम यांचे घरी बैठक आयोजित करण्यात आली होते.बैठकीसाठी अक्षय भोसले-पाटील व भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रविण माने,विश्वजीत पाटील उपस्थित होते. यावेळी गावातील भाजपाचे मसुचीवाडी गावातील प्रमुख उपस्थित होते त्यांनी हर्षाली बाबत माहीती उपस्थित मान्यवराना दिली त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ 10000/- रुपयांची मदत केली व लोकांना आव्हान करण्याचे ही आश्वासन दिले आहे 

संकटकाळात निशिकांत (दादा) युथ फाउंडेशन ने दाखवलेल्या तत्परते बाबत गावच्या वतीने धन्यवाद मानन्यात आले.यावेळी अक्षय पाटील यांनी समाजातील सामाजिक संस्था, सहकारी संस्था, नागरीक यांना ही मदतीचे आव्हान केले बैठकीसाठी मानद संचालक वसंत कदम, मा.डे.सरपंच प्रकाश कदम, ग्रामपंचाय सदस्य अमित कदम, अक्षय कदम, सचिन कदम, प्रणव कदम आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments