Daily Mahasatta

Daily Mahasatta

अभिलाष साटपे याची रिझर्व्ह बँकेच्या रिसर्च आॕफीसर पदी निवड

वाळवा (रहिम पठाण)

साटपेवाडी ता.वाळवा येथील अभिलाष अरुण साटपे याने रिझर्व्ह बँक आॕफ इंडिया मध्ये मॕनेजर( रिसर्च आॕफीसर) डिपार्टमेंट आॕफ स्टेटॕस्टीक अॕण्ड इन्फरमेशन मॕनेजमेंट रिझर्व्ह बँक आॕफ इंडिया या पदावरती निवड झाली आहे.

तो म्हणाला, मी स्वतः शिवाजी विद्यापीठामध्ये सेल्फ स्टडी केली आहे. सातत्य व चिकाटी या दृढ असतील तर यश मिळवण्यात मदत होत असते. मी शेतकरी सर्वसामान्य  कुटुंबातील असून कष्टाची जाणीव लहान पणापासूनच आहे. माझे बारावी नंतरचे शिक्षण कोल्हापूर मध्ये झाले. आई वडीलांचा आशिर्वाद सदैव पाठीशी खंबीरपणे आहे.

वडील अरुण साटपे म्हणाले त्याच्या या यशामुळे आम्हा घरच्या सर्वांना अभिलाषचा अभिमान आहे. तसेच कायम शेतीमध्ये असल्यामुळे त्याच्या प्रयत्नांना साथ देण्याचे काम आम्ही केले हे सगळे यश त्याच्या स्वतःच्या मेहनतीचे आहे.

Post a Comment

0 Comments