Daily Mahasatta

Daily Mahasatta

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पुरग्रस्तांची भेट


वाळवा (रहिम पठाण)
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते मा.देवेंद्र फडणवीस व मा.प्रविण दरेकर आज सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होते.त्यांनी वाळवा येथे प्रत्यक्ष पुरग्रस्त नागरीकांच्या अडचणी जाणून घेतल्या व परिस्थितीचा आढावा घेतला. शेतीचे नुकसान अतिशय मोठ्या प्रमाणात झाले आहे. याच्यावरती भर द्यावा अशी मागणी लोकांनी केली हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी यांनी वाळव्यातील द्राक्ष बागायतदार यांना वस्तुस्थितीचा विचार करुन भरीव मदत करण्याची मागणी केली. 

यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत मा.आमदार शिवाजीराव नाईक भाजपा जिल्हाअध्यक्ष मा.पृथ्वाराज देशमुख इस्लामपूर नगरीचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी सोबत वाळवा ग्रामपंचायत व शिरगांव ग्रामपंचायत पदाधिकारी व पुरग्रस्त नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments