Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यातील थॅलेसेमिया रूग्णांसाठी औषधे उपलब्ध करा

: फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया अॉर्गनायझेशन व पालकांच्या वतीने अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकीत्सक यांना निवेदन

सांगली (प्रतिनिधी) : जानेवारी महिन्यात फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया अॉर्गनायझेशनने केलेल्या पाठपुराव्याने मिरज सिव्हिल मध्ये थॅलेसेमिया रूग्णांसाठी औषधे उपलब्ध तर झाली होती, पण जेमतेम महिन्याच्या आतच हा औषधसाठा संपला, त्यातच कडक लॉकडाऊन आणि जिल्ह्याबाहेर जाण्याला बंदीमुळे रूग्णांचे पालक ही औषधे आणण्यासाठी कोल्हापूर किंवा सातारा सिव्हिल येथेही जाऊ शकत नव्हते. मागील वर्षीच्या लॉकडाऊन प्रमाणे आत्ता देखील अॉर्गनायझेशनशी मदतीसाठी संपर्क साधणाऱ्या सांगली तसेच सातारा जिल्ह्यातील थॅलेसेमिया रूग्णांच्या पालकांना संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूरातून औषधे घरपोच देण्यात येतायत. पण गेले तीन महिने जिल्ह्याबाहेरील रूग्णांना औषधे देऊन कोल्हापूरातील सी.पी.आर जिल्हा रूग्णालयातील औषध साठा देखील संपत आला आहे. तरी लवकरात लवकर सांगली जिल्ह्यातील थॅलेसेमिया रूग्णांसाठी पुन्हा औषधे उपलब्ध करून द्यावीत व रूग्णांची औषधाविना होत असलेली गैरसोय थांबवावी. या मागणीचे निवेदन फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया अॉर्गनायझेशन, महाराष्ट्र च्या वतीने मिरज सिव्हिलचे अधिष्ठाता डॉ. सुधिर नणंदकर व medicine supritendant बालरोग विभाग प्रमुख डॉ. शिशीर मिरगुंडे यांना देण्यात आले.

यावेळी फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया अॉर्गनायझेशनचे अध्यक्ष धनंजय नामजोशी, उपाध्यक्ष अभिजीत बुधले, दत्तात्रय कदम, राजू वाघमारे, किशोर कांबळे, सुंदर धोंगडी, सचिन वैरागे, नरेश सचदेव हे थॅलेसेमिया रूग्णांचे पालक उपस्थित होते. पालकांनी मागणी केल्याप्रमाणे याप्रसंगी सुध्दा ९ रूग्णांसाठी अॉर्गनायझेशन कडून पालकांना औषधे देण्यात आली.सांगली सिव्हिल रूग्णालय येथे जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या वतीने डॉ. प्रमोद चौधरी यांनी निवेदन स्विकारले.

Post a Comment

0 Comments