Daily Mahasatta

Daily Mahasatta

जत दुय्यम निबंधक कार्यालय बनणार कोरोना प्रसार केंद्र

जत (सोमनिंग कोळी) : जत शहरासह तालुक्यातील कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांच्या संख्येमध्ये चढउतार सुरू असतानाच येथिल दुय्यम निबंधक कार्यालयात मात्र  पक्षकारांची मोठी गर्दी होत असून यामुळे कोरोना नियंत्रणात येण्याऐवजी कोरोनाचा विस्फोट झाल्याशिवाय रहाणार नाही. यासाठी प्रशासनाने कारवाई करण्याची अपेक्षा जत शहरवासियांकडून  करण्यात येत आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की जत तालुक्यातील १२१ गावातील जमिनीचे व घर जागेचे व अन्य व्यवहार हे जत दुय्यम निबंधक कार्यालयात होतात. या व्यवहारासाठी तालुक्यातील पक्षकार  हे या कार्यालयात येत असतात. या कार्यालयात विस ते पंचवीस दस्तऐवज नोंदणी ची कामे होत असतात. 

    जत दुय्यम निबंधक कार्यालय अखत्यारीत असलेले स्टॅम्पव्हेंडर यांच्या समोर स्टॅम्प खरेदी करण्यासाठी पक्षकार मोठ्या प्रमाणात गर्दी करित असतात. जत त्यांच्याकडून कोरोना नियमांचे कोणत्याही प्रकारे पालन होताना दिसत नाही. याप्रसंगी सोशल डिस्टन्सिंग चे नियम नावालाच अशी परिस्थिती असते यासाठी प्रशासनाने योग्य ते नियोजन करावे अशी मागणी जतशहरवासियांतून करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments