Daily Mahasatta

Daily Mahasatta

काँग्रेसने उभारलेल्या निवारा केंद्राला ऊर्जामंत्र्यांची भेट

--------
सांगली : पूरग्रस्तांसाठी उभारलेल्या निवारा केंद्राला ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी भेट दिली. यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.

सांगली, (प्रतिनिधी)
सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी कल्पतरू मंगल कार्यालयात सुरु केलेल्या निवारा व अन्नछत्र केंद्राला राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी भेट दिली. 

पूरग्रस्तांसाठी  काँग्रेसच्यावतीने तातडीने केलेल्या या व्यवस्थेबद्दल डॉ. राऊत यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी कृषी व सहकार राज्यमंत्री ना. विश्वजीत कदम आणि शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते. 

डॉ. राऊत यांनी पूरग्रस्त नागरिकांसोबत बोलून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. निवारा केंद्रात असलेल्या जेष्ठ नागरिकांची त्यांनी आपुलकीने विचारपूस केली. पूर संकटावर आपण यशस्वी मात करू असा विश्वास त्यांनी दिला.

पूर आल्यानंतर लगेचच पृथ्वीराज पाटील यांनी नागरिकांसाठी हे निवारा केंद्र सुरू केले. त्या ठिकाणी  जेवणाची आणि राहण्याची  उत्तम सोय करण्यात आली आहे. महापालिकेच्यावतीने या नागरिकांची कोरोना
टेस्टही केली आहे.
--------

Post a Comment

0 Comments