Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत वीज वितरणसाठी २५ कोटींचा निधी मिळावा: महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांची उर्जा मंत्र्यांकडे मागणी

सांगली (प्रतिनिधी)

सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पुरबाधीत क्षेत्रातील विज वितरण व्यवस्थेचे सक्षमीकरण करणेसाठी २५ कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी उर्जा मंत्री, नितीन राऊत  यांचेकडे  यांचेकडे केली.

उर्जा मंत्री नितीनजी राऊत साहेब, कृषी राज्यमंत्री  ना. विश्वजीत कदम,  यांनी आज पुरबाधीत क्षेत्राची पहाणी केली. त्यामध्ये प्रामुख्याने पुराच्या पाण्यामुळे बाधीत झालेल्या विज वितरण व्यवस्थेची पहाणी केली.

महापुराच्या पाणी प्रवाहामुळे, वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांबांचे व विद्युत वाहिन्यांचे तसेच ट्रान्सफॉर्मरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महापुराच्या कालावधीमध्ये पुरबाधीत क्षेत्रातील घरे, व्यापारी आस्थापना, यावर्षी किमान ५ ते ८ फूट पाण्याखाली होत्या. तसेच या पुरबाधीत क्षेत्रातील विद्यु ट्रान्सफॉर्मर, वीज जोडण्या खराब झालेले आहेत. त्याच प्रमाणे अत्यंत महत्वाचे म्हणजे महानगपालिका क्षेत्रामध्ये पाणी पुरवठा करणेकामी असणाऱ्या पंपींग स्टेशनला विजपुरवठा करण्याकरीता जो विजपुरवठा होतो त्याच्या विद्युत वाहिन्या या नदी पात्रातुन कमी उंचीवरुन ओढलेल्या आहेत. त्यामुळे या विद्युत वाहिन्या प्रतिवर्षी पुरामध्ये पाण्या खाली जात असल्याने विद्युत पुरवठा खंडीत होतो. तसेच सदरचा विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने जॅकवेलवरुन पिण्याचे पाणी उचलनेचे काम बंद होते त्यामुळे नागरिकांना टँकर द्वारे पिण्याचे पाणी पुरवठा करावा लागतो. तसेच शेरीनाला पाणी उपसा केंद्राचा विद्युत पुरवठाही खंडीत होतो. त्यामुळे कोल्हापुर रोड लिंगायत स्मशानभूमी मधून नदीपात्रातून जॅकवेल पर्यंत नदीपात्रावरुन आलेली विद्युत वाहिनीची उंची वाढविणे करीता उंच टॉवर उभे करुन उंचावरुन विद्युत वाहिन्या घेणे गरजेचे आहे. जेणेकरुन अखंड विद्युत पुरवठा सुरु रहाणार आहे.

तसेच महानगरपालिका क्षेत्रातील पुराचे पाणी जात असलेल्या सर्व प्रभागामधील रस्त्यावरील ट्रान्सफॉर्मरची उंची वाढविणे गरजेचे असून, तरी, महानगरपालिका क्षेत्रातील स्ट्रीट लाईटशी संबंधीत तअनुषंगीक कामांकरीता र.रु.२५ कोटी मात्र निधीची मागणी मा.ना. नितीनजी राऊत, उर्जा मंत्री, महाराष्ट्र राज्य, यांचेकडे करणेत आली आहे.

यावेळी उपमहापौर मा.उमेश पाटील, विरोधीपक्षे नेते मा.उत्तम साखळकर, इंडिपेंडट डायरेक्टर ऑफ पारेशन मा. बॉबी भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments