Daily Mahasatta

Daily Mahasatta

महिलेचे अश्लील फोटो सोशल मीडियात टाकले; आरोपीला अटक

शिराळा (विनायक गायकवाड)

इंगरुळ ता. शिराळा येथील एका महिलेची विवस्त्र छायाचित्रे व्हाट्सअप ग्रुपवर पाठवण्याचा बीभत्स व धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी आरोपीस अटक करून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

         याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, इंगरुळ येथील सदर महिला आपल्या पती समवेत मुंबई येथे वास्तव्यास आहे. तिचा संपर्क गावातील प्रकाश बजरंग कांबळे वय ३५ याच्याशी होता. प्रकाश याने संबंधित महिलेला ९ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास व्हिडिओ कॉल करून तुला विवस्त्र पहायचे आहे असा आग्रह धरला. तिने तसे करण्यास नकार दिला. तसे न केल्यास तुझ्या पतीला या पूर्वी घडलेल्या सगळ्या घटना सांगून तुझी बदनामी करेल अशी धमकी दिली. यानंतर प्रकाश याने व्हिडिओ कॉल केला आणि संबंधित महिलेशी व्हिडिओ कॉल सुरू असताना त्याचे स्क्रीन शॉट काढले. दरम्यान आरोपीने महिलेला तू गावी रहायला ये असे सांगितले, त्यास तिने नकार दिला. याचा राग मनात धरून आरोपीने सिद्धार्थ नगर इंगरुळ या व्हाट्सअप ग्रुप वर संबंधित महिलेची व्हिडिओ कॉलवेळी काढलेले स्क्रीन शॉट मधील विवस्त्र छायाचित्रे पाठवली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

           हि बाब संबंधित महिलेला व तिच्या कुटुंबात समजताच मंगळवारी शिराळा पोलिसात संबंधित महिलेने आरोपी प्रकाश याचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश दिले आहेत. अधिक तपास पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार करत आहेत.

Post a Comment

0 Comments