Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून आज शनिवार ता. १० रोजी एकाच दिवशी १२७१ रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात २४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट सुरू झाला असून आज १२७१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यापासून एक हजारच्या आसपास असलेली रुग्ण संख्या आता बाराशे पेक्षा अधिक झाली आहे.  उपचारा खाली असणाऱ्या रुग्णांच्या संख्येने देखील दहा हजाराचा आकडा पार केला असून आज १० हजार १० इतक्या रुग्णांवर सध्या जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. आज म्युकरमायकोसीसचे दोन नवीन रुग्ण आढळून आले असून एका रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच आज ९५५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आज जिल्ह्यात तालुकानिहाय आढळून आलेले रुग्ण पुढील प्रमाणे : आटपाडी ६१,  जत २८, कडेगांव १०३, कवठेमंकाळ ३१, खानापूर ६०, मिरज १२५, पलूस ९०, शिराळा ६७, तासगाव १२७, वाळवा ३५१ तसेच सांगली शहर १८०  आणि मिरज शहर ४८ असे सांगली जिल्ह्यात एकूण १२७१ रुग्ण आढळून आले आहेत.

Post a Comment

0 Comments