Daily Mahasatta

Daily Mahasatta

विस्टियॉनतर्फे आयुष संस्थेला तीन लाखांची मदत

कुपवाड ( प्रमोद अथनिकर)
विस्टियॉन कंपनीच्यावतीने येथील आयुष सेवाभावी संस्थेला तीन लाखांची विविध औषधे व ऑक्सिजन मशीनची मदत देण्यात आली. कंपनीचे व्यवस्थापक भानुप्रताप देशमुख यांच्यासह आयुषचे अध्यक्ष अमोल पाटील, उप अध्यक्ष विक्रम चव्हान, रितेश शेठ, अजित कांबळे यावेळी उपस्थित होते.  
      शहरातील कोव्हीड रुग्णांवर उपचारासाठी ही औषधे विनामूल्य देण्यात येणार असल्याचे पाटील यांनी यावेळी  सांगितले. पाटील म्हणाले, विस्टियॉन कंपनीने सामाजिक बांधिलकीतुन यापूर्वी २५ फोल्डिंग बेडची मदत केली होती. तीन कोव्हीड सेंटरमध्ये हे बेड दिले आहेत. कंपनीने आता कोव्हीड रुग्णांना आवश्यक असलेली औषधे, दोन ऑक्सिजन मशीन दिले आहे.

Post a Comment

0 Comments