Daily Mahasatta

Daily Mahasatta

पुरग्रस्तांच्या पुर्नवसनासाठी पाठपुरावा करणार : ना. देवेंद्र फडणवीस

इस्लामपुर/ हैबत पाटील

महापुराने संपुर्ण नदीकाठ भयभीत झाला असुन मागील महापुराचा अनुभव डोळ्यासमोर ठेवुन  भविष्यातील नैसर्गिक संकट टाळण्यासाठी नदीकाठच्या लोकांचे पुर्नवसन सुरक्षित ठिकाणी होणेसाठी  राज्य सरकार कडे पाठपुरावा करणार असुन आम्ही तुमच्या सोबत आहोत काळजी करु नका अशा शब्दात आज वाळवा येथील पुरग्रस्तांना विरोधीपक्ष नेते ना.देवेंद्र फडणवीस यांनी धीर दिला.
           आज वाळवा येथील पुरस्थितीचा फटका बसलेल्या कैकाडी गल्ली,कुंभार गल्ली व बौध्द समाज या भागाची पहाणी करुन पुरग्रस्त  नागरीकांशी संवाद साधला,यावेळी साहेब आमची कायमस्वरुपी सुरक्षीत ठिकाणी व्यवस्था करा,आमचे फार नुकसान झाले आहे अशी विनंती सर्व पुरग्रस्त नागरीकांनी केली.
              यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते ना.प्रविण दरेकर,भाजपाचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख,खा.संजय पाटील,आ.सदाभाऊ खोत,उरुण- इस्लामपुर नगरपरीषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील (दादा),जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख (भाऊ),हुतात्मा उद्योग समुहाचे युवा नेते गौरव नायकवडी आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
       यावेळी ना. देवेंद्र फडणवीस व ना.प्रविण दरेकर यांनी वाळवा येथील पुरस्थितीमुळे घरांची झालेली पडझड पाहुन संबधीत कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधला,महापुर ओसरुन पुरग्रस्त आपआपल्या घरी पोहचले तरी या सरकार एक ही रुपयाची मदत केली नाही हे दुर्देवी असल्याचे सांगुन नाराजी व्यक्त केली.मागील महापुराचा अनुभव लक्षात घेऊन आपण योग्य वेळी सुरक्षीत स्थळी स्थलांतरीत झाल्याने पुढील धोका टाळता आला.मात्र नैसर्गीक आपत्ती सातत्याने येत असेल तर कायमस्वरुपी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होणे आवश्यक आहे,आपल्या सर्वाची मागणी रास्त असुन सरकारकडे याबाबत भाजपाच्या माध्यमातुन मी व्यक्तीश:पाठपुरावा करणार आहे,तुम्ही काळजी करु नका असा शेवटी धीर दिला.
            यावेळी उरुण -इस्लामपुर नगरपरीषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले -पाटील (दादा) म्हणाले भाजपा सरकारच्या काळात महापुरावेळी पुरग्रस्तांना थेट मदत तात्काळ पोहचविली होती,आज महापुर ओसरला,पुरग्रस्त घरी पोहचले तरी या  महाविकास आघाडी सरकारने दौरे,घोषणा,अधिकार्‍यांच्या बैठकीचा फार्स या व्यतीरिक्त काही ही केलेले नाही.हे सरकार पुर्णत: उदासिन असुन जनतेच्या संकटाबाबत यांना गांभीर्य नाही ,पुरग्रस्त आज ही मदतीच्या प्रतिक्षेत आहे,भाजपाच्या माध्यमातुन आवश्यक ती मदत आम्ही पोहचवत आहोत मात्र ठोस व सरसकट मदतीची आवश्यकता आहे.याचबरोबर कायम सुरक्षित ठिकाणी इस्लामपुर विधानसभा मतदार संघातील पुरग्रस्त नागरीकांचे पुर्नवसन व्हावे  याबाबत आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा अशी विनंती ना.देवेंद्र फडणवीस व ना.प्रविण दरेकर यांच्याकडे पुरग्रस्त नागरीकांच्या वतीने निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांनी केली.
              यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक,माजी आ.भगवानराव सांळुखे,सत्यजीत देशमुख,निताताई केळकर,भाजपा प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष राहुल महाडीक,वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे,शिराळा भाजपा अध्यक्ष सुखदेव पाटील,माजी तालुका अध्यक्ष प्रसाद पाटील,भाजपाचे जेष्ठ नेते मधुकर हुबाले,भाजपाचे युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष रोहित पाटील,उपाध्यक्ष प्रविण माने,वाळवा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष चंद्रकांत पाटील,प्रांजली अर्बन निधी बॅकेचे चेअरमन संदीप सावंत,बागणीचे सरपंच संतोष घनवट,वाळव्याच्या सरपंच शुभांगी माळी,भाजपा शहर अध्यक्ष अशोकराव खोत,संजय हवलदार,विक्रम शिंदे,अक्षय पाटील,मनोज मगदुम,निवास पाटील,अक्षय कदम, संदीप चव्हाण, मनोज मगदुम, शिरीष रसाळ,वसंत कदम,राकेश पाटील,रणजित माने,करण कोकाटे,गजानन पाटील आदिसह अन्य मान्यवर ,पुरग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments