Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोरोना झाल्याने वाढदिवसालाच युवकाची आत्महत्या

इस्लामपूर (हैबत पाटील )

     कोरोना पॉझीटीव्ह आल्याच्या भितीतून इटकरे ता. वाळवा येथील तरुण अभियंता निखील लक्ष्मण भानुसे (वय २८) याने आपल्या वाढदिवसालाच गळफास लावून आत्महत्त्या केल्याने वाढदिवसाची रात्रच त्याच्यासाठी काळ रात्र ठरली.
      केवळ तीन महिन्यापुर्वी निखिल चे लग्न झाले होते. सिव्हील इंजिनीअर असणाऱ्या तरुणाचा अशा मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  नुकताच त्याने या परिसरात बांधकाम व्यवसायासही सुरुवात केली होती.
   दरम्यान चार दिवसापुर्वी त्याचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझीटीव्ह आला होता. अहवाल पॉझीटीव्ह आल्यापासूनच तो चिंतेत व अस्वस्थ होता. या नैराश्येतूनच बुधवारी वाढदिवसादिवशीच रात्री त्याने घरासमोरील जनावरांच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्त्या केली. कुरळप पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. कोरोना झाल्याच्या भितीतून त्याने आत्महत्त्या केल्याचे

Post a Comment

0 Comments