Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्रसाठी कवठेमहांकाळच मध्यवर्ती ठिकाण - माजी शिक्षण सभापती रवी पाटील

जत (सोमनिंग कोळी) : शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राला तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथे शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी तत्त्वतः मंजुरी दिली असल्याचे वृत्त येताच जत , कवठेमहांकाळ, खानापूर, मिरज, सांगली येथे संतापाची लाट उसळली आहे.

'शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र' जत किंवा कवठेमहांकाळ येथे सुरू करावे अशी मागणी सांगली जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य ताम्मणगौडा रवी पाटील यांनी केली.

ताम्मणगौडा रवी पाटील म्हणाले की, विद्यापीठाच्या उपकेंद्रचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून कवठेमहांकाळ हे योग्य ठिकाण आहे. या उपकेंद्रासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांची प्रत्यक्षात भेट घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांनी कवठेमहांकाळ येथील जागेसंदर्भात झालेले मागील सर्व ठराव आणि कागदपत्रे याचा अभ्यास करून निर्णय घेण्याची मागणी करणार आहे.

तसेच याबाबतची भूमिका मांडून उपकेंद्र जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असणारे कवठेमहांकाळ ला होण्यासाठी मागणी करणार आहे. उपकेंद्र कवठेमहांकाळ येथे होण्यासाठी व त्यास मंजुरी मिळेपर्यंत लोकप्रतिनिधी, माजी शिक्षण सभापती व संस्थाचालक या नात्याने मी जनतेबरोबर राहणार असल्याचे ही ताम्मणगौडा रवी पाटील म्हणाले.

Post a Comment

0 Comments