Daily Mahasatta

Daily Mahasatta

गुन्हे दाखल झाले तर बेहत्तर, शुक्रवार पासून दुकाने उघडणार : खासदार संजयकाकासांगली (प्रतिनिधी)

गेल्या तीन महिन्यांपासून सांगली जिल्ह्यात कठोर निर्बंध असून देखील कोरोना नियंत्रणात आला नाही. मात्र सामान्य माणस आणि दुकानदारांचे जीवन असह्य झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अन्यथा शुक्रवारी स्वतः उभा राहून शटर उघडून देणार, मग गुन्हे दाखल झाले तर बेहत्तर, असे खुले आव्हान खासदार संजयकाका पाटील यांनी प्रशासनाला दिले आहे.

    सांगली जिल्ह्यातील व्यापार आणि दुकाने सुरू करण्यासंदर्भात खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ आणि आमदार सुरेश खाडे यांची व्यापाऱ्यांसमवेत संयुक्त पत्रकार परिषद झाली.

    यावेळी खासदार संजय काका पाटील म्हणाले, कोल्हापुरातील सर्वपक्षीय नेते मंडळींनी एकत्र येत जिल्ह्यातील सर्व दुकाने आणि व्यवहार सुरळीत सुरू केले आहेत. सांगली जिल्ह्यात देखील गेल्या तीन महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने व्यापारी दुकानदार यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आता असह्य झालं आहे. त्यामुळे प्रशासनाने व्यापाऱ्यांचा अंत न पाहता गुरुवारपर्यंत सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी. प्रशासनाने गुरुवार पर्यंत दुकाने सुरू करण्यास परवानगी न दिल्यास भाजपचे खासदार, आमदार आणि सर्व पदाधिकारी व्यापाऱ्यांसमवेत रस्त्यावर उतरून स्वतः शटर उघडून दुकाने सुरू करतील. प्रसंगी आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील पण आता लॉकडाऊन सहन करणार नाही, असे खुले आव्हान खासदार संजय काका पाटील यांनी प्रशासनाला दिले आहे
 

Post a Comment

0 Comments