Daily Mahasatta

Daily Mahasatta

इस्लामपूरात चुकीचा एचआरसीटी स्कोअर दाखवून रुग्णांची लुबाडणूक: रयत क्रांती संघटनेचा आंदोलनाचा इशारा

इस्लामपूर ता.( प्रतिनिधी )
     येथील एका नामांकित सिटी स्कॅन सेंटरमध्ये रुग्णांचा एच.आर.सी.टी. स्कोर चुकीचा सांगत रुग्णांच्या जीवाशी खेळ करून फसवणूक करूत त्यांची लूट केली जात आहे. लवकरात लवकर याची चौकषी व्हावी याबाबतचे निवेदन तहसिलदार यांना देणेत आले आहे. याची सखोल चौकशी व्हावी अन्यथा माजी कृषी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलनाचा इशारा रयत क्रांती संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. 
     येथील खाजगी रुग्णालयातील एका रूग्णाचा एच.आर.सी.टी. स्कोर १६ आला, दुसऱ्या एका सिटी स्कॅन सेंटरमध्ये एच.आर.सी.टी केली असता तिथे १२ स्कोर आला. यावरून असे दिसून आले की रूग्णांची फसवणूक करत लूट चालली आहे. काल हा घृणास्पद प्रकार उघडकीस आल्याने इस्लामपूरसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्कोअर जास्त आहे  सांगून छातीत जास्त प्रमाणात इन्फेक्शन आहे असे सांगितले जाते. यामुळे रूग्ण घाबरून भितीपोटी धास्तीने मरण पावत आहेत. कोरोनाचा सध्या सर्वत्र व्यापार चालू आहे. डॉक्टर, सिटीस्कॅन सेंटर आणि लॅबोरेटरी यांचे हितसंबंध आहेत. रिपोर्ट चुकीचा दाखवून त्याच डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्यास सांगितले जाते. या प्रकारांची सखोल चौकशी व्हावी असे या निवेदनात म्हटले आहे.
      यावेळी रयत क्रांती संघटनेचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मोहसीन पटवेकर, माजी नगरसेवक फारूक इबुशे, हाफिज मुस्तकीम मोमीन, विक्रांत गोंदकर, कैस इबुशे, फैज पटवेकर, जोयेब शेख उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments