Daily Mahasatta

Daily Mahasatta

प्रतिकदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

पेठ (रियाज मुल्ला)

सांगली जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष युथ आयकॉन मा. प्रतिकदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया पेठ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पेठ, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पेठ, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पेठ व मा. अतुल पाटील मित्र परिवार यांच्या वतीने गोळेवाडी येथील सरकारी दवाखाना परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
         निसर्गाची झपाट्याने  हानी होत असून दररोज हजारो वाहनांमधून सोडण्यात येणारा कार्बनडाय ऑक्साईड वायूचा दुष्परिणाम होत आहे. वृक्ष लागवड करून वातावरणातील  समतोल राखणे गरजेचे असल्याचे मत पेठ चे युवा नेते अतुल पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी  संपतराव पाटील, शरद पाटील , हेमंत पाटील , डॉ.अभिराज पाटील , नामदेव कदम , भागवत पाटील, प्रकाश पाटील , डॉ.सुभाष भांबुरे, रविकिरण बेडके, दिग्विजय पाटील, अशोक पाटील,शेखर बोडरे,तुळशीदास पिसे,अमोल भांबुरे,दीपक जाधव,सागर गुरव,प्रकाश माळी, बजरंग शिद,अल्लाउद्दीन जमादार,शिवराज पाटील,विनायक बेडके,शुभम माळी,प्रथमेश देशमाने,श्रेयस गाताडे,लखन सपकाळ,प्रथमेश भांबुरे,बजरंग गुरव,प्रदीप गावडे,स्वप्नील जानकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments