Daily Mahasatta

Daily Mahasatta

फिर्यादीच निघाला चोर, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शेडगेवाडी (याकुब मुजावर) : शेडगेवाडी फाटा (ता. शिराळा) येथील अंबिका स्टील सेंटर मधील साडे सतरा लाखाची चोरी प्रकरणी फिर्यादी जयंतीलाल रामलाल ओसवाल याला मुद्देमालासह अटक केली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी पत्रकार बैकीत दिली.

संशयित जयंतीलाल रामलाल ओसवाल याचे
शिराळा-चांदोली रस्त्यावर शेडगेवाडी फाटा या ठिकाणी स्वतःच्या मालकीचे अंबिका स्टील या नावाचे दुकान असून त्यांच्या लहान भाऊ प्रकाश यास शेडगेवाडीतच नवीन स्टील दुकान सुरु करण्यासाठी पैसे द्यायचे ठरले होते.मात्र जयंतीलाल यास ते मान्य नसल्याने त्याने मंगळवार दि.६  रोजी सर्व कुटूंबियासह कराड ला जेवण करुन आल्यावर आपल्या घरात चोरी झाली असल्याचा गुन्हा कोकरुड पोलिसात दाखल केला होता.याप्रकरणी प्रथम पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली होती.मात्र जयंतीलाल याच्या मोबाईल आणि तपसावरून हाच आरोपी असल्याने शनिवारी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता भावास पैसे द्यायचे नसल्याने मी साडे सतरा लाख रुपये कराड येथील मित्राकडे ठेवल्याचे सांगितल्याने वरील सर्व रक्कम ताब्यात घेऊन आरोपीस अटक करण्यात आली आहे.

गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, अप्पर पोलीस अधिक्षक मनीषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या सुचने प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, सहायक पोलिस फौजदार शंकर कदम, पोलीस एकनाथ भाट, मोहसीन मुल्ला, विशाल भोसले, शेखर गायकवाड,कॅप्टन गुंडवाडे यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.

Post a Comment

0 Comments